Nagpur Registration Office

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्र. 5 आणि इतर कार्यालयांमध्ये 500-600 बनावट दस्तनोंदणी झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप असून तातडीने विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

सब रजिस्ट्रार कृष्णा राऊत यांच्यासह संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी; चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नागपूर : दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 5 तसेच इतर कार्यालयांमध्ये बनावट किंवा डुप्लिकेट RL, NA, नगररचना नकाशा आणि Sanction Map यांच्या आधारे तब्बल 500 ते 600 बनावट दस्तनोंदणी झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाची तातडीने विभागीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक, नागपूर विभाग यांच्याकडे युवक काँग्रेसने निवेदन साद केले. बनावट शिक्के असलेल्या पुराव्यांसह हे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणातील कागदपत्रांची मूळ शासकीय अभिलेखांशी पडताळणी करावी, तसेच संबंधित कार्यालयांमधील CCTV फुटेज आणि डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच सब रजिस्ट्रार कृष्णा राऊत यांच्यासह सर्व संबंधितांची भूमिका तपासण्यात यावी, असेही युवक काँग्रेसने म्हटले आहे.

चौकशीदरम्यान गैरप्रकार किंवा बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे सिद्ध झाल्यास कृष्णा राऊत यांच्यासह सर्व दोषींविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने विभागीय चौकशी करून आवश्यक कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन साद करताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अक्षय हेटे, तसेच सुशांत लोखंडे, रजा अली, समीर तिमांडे, आशुतोष कांबळे, शिवम चौधरी, साहिल मोहोड आणि अनुप भंडारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

खरीप हंगाम सुरू होऊन पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही बुलढाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 05, 2026
१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पोलिसांनी वाजव्या पद्धतीने करज वसूल करण्याच्या आरोपासह, १२.४० कोटींवर करज होणाऱ्या प्रकरणात व्रतकर्तेवर 'बनावट विक्रीखत', अवाजव्या रकमेचे मागणी करणे आदी आरोप केले आहेत. यातील पोलिसांचा गुन्हा दाखला दाखल झाला आहे. प्रकरणातील तपासात कागदपत्रांचे दुरुस्ती व द्रव्यवाहतीचा अभ्यास चालू आहे.

Sep 03, 2026
ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 268 शिक्षक बदली प्रकरणात फौजदारी कारवाईला टाळाटाळ

ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 268 शिक्षक बदली प्रकरणात फौजदारी कारवाईला टाळाटाळ

अकोला जिल्हा परिषदेतील 268 शिक्षकांच्या बदली प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले होते.

Sep 03, 2026
‘छात्रों की गूंज’च्या धर्तीवर ‘खिलाड़ियों की गूंज’ उपक्रम सुरू करा; मयूर तायडे यांची राहुल गांधींकडे मागणी

‘छात्रों की गूंज’च्या धर्तीवर ‘खिलाड़ियों की गूंज’ उपक्रम सुरू करा; मयूर तायडे यांची राहुल गांधींकडे मागणी

‘खिलाड़ियों की गूंज’ हा स्वतंत्र राष्ट्रीय संवाद उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी वाशिम जिल्हा युवक काँग्रेस क्रीडा आघाडीचे अध्यक्ष मयूर तायडे यांनी केली आहे.

Aug 26, 2026