अतिरिक्त ४० रुपये देण्यास नकार दिल्याने उबर चालकाने तरुणीला मारहाण केल्याचा आरोप

अतिरिक्त ४० रुपये देण्यास नकार दिल्यामुळे उबर चालकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील एका तरुणीने केला आहे.

अतिरिक्त ४० रुपये देण्यास नकार दिल्याने उबर चालकाने तरुणीला मारहाण केल्याचा आरोप

Uber India

मुंबई (Uber India) : अतिरिक्त ४० रुपये देण्यास नकार दिल्यामुळे उबर चालकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील एका तरुणीने केला आहे. मुंबईस्थित कंटेंट क्रिएटर शिवानी हिने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणाची चर्चा रंगताच उबर इंडियानेही प्रतिक्रिया देत संबंधित चालकाविरोधात धोरणानुसार कारवाई केल्याचे सांगितले.

शिवानीच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील महालक्ष्मी येथून नेरूळकडे उबरने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. उबर अॅपमध्ये दर्शविलेल्या भाड्याव्यतिरिक्त चालकाने तिला ४० रुपये रोख देण्याची मागणी केली. मूळ भाडे ५०१ रुपये असताना अतिरिक्त पैसे का द्यायचे, असा प्रश्न तिने चालकाला विचारला. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर चालकाने तिला धमकावले आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन करत मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

चालकाने आपल्याला थप्पड मारली तसेच हात पकडून पिळल्याचा आरोप शिवानीने केला. वाद सुरू असताना चालकाने वाहन लॉक केले आणि तिला बाहेर पडू दिले नाही, असेही तिने सांगितले. अखेर तिच्या कार्यालयातील सहकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिची सुटका झाली.

“हा केवळ सेवा गुणवत्तेचा प्रश्न नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दा आहे,” असे शिवानीने म्हटले आहे. तिने आणखी एका व्हिडिओद्वारे उबर इंडियाने सुरुवातीला चालकाची बाजू घेतल्याचे दर्शवणारे स्क्रीनशॉट्सही शेअर केले. तसेच, आपले खाते काही काळासाठी ब्लॉक करण्यात आले होते आणि काही चॅट्स डिलीट झाल्याचाही दावा तिने केला आहे.

प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर उबर इंडियाने अधिकृत प्रतिक्रिया दिली. “ग्राहकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक अत्याचाराला किंवा धमकीला उबर प्लॅटफॉर्मवर स्थान नाही,” असे कंपनीने स्पष्ट केले. संबंधित चालकाच्या वर्तनाचा निषेध करत त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. तसेच, तरुणीचे खाते पुन्हा सुरू करण्यात आले असून ती कायदेशीर कारवाई करत असल्यास कंपनीकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही उबर इंडियाने म्हटले आहे.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

राज-उद्धव ठाकरेंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला. आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार.

Oct 02, 2026