Mumbai Water Supply

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

दररोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया; जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह अनधिकृत जोडण्या नियमित करण्याचा पालिकेचा प्रयत्न

मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसमोर उपलब्ध पाण्याचा पूर्ण वापर करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहराला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. त्यापैकी तब्बल ३४ टक्के म्हणजेच १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी प्रस्तावित गारगाई धरणाची दररोजची क्षमता ४४० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे गळती आणि चोरीतून वाया जाणारे पाणी हे गारगाईसारख्या तब्बल तीन धरणांच्या क्षमतेइतके ठरते.

मुंबईची दररोजची पाण्याची गरज सुमारे ४,६०० दशलक्ष लिटर आहे. मात्र, सध्या शहराला प्रत्यक्षात ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे मागणीच्या तुलनेत जवळपास ५०० दशलक्ष लिटरची कमतरता आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्यापैकी मोठा हिस्सा विविध कारणांमुळे वाया जाणे ही मुंबई महापालिकेसाठी गंभीर बाब ठरत आहे.

पाणी चोरीचे प्रमाण अधिक असल्याची पालिकेची माहिती

गळती, अनधिकृत जलजोडण्या, नोंद न झालेले पाणी तसेच मीटरमधील त्रुटी यांचा ‘नॉन-रेव्हेन्यू वॉटर’मध्ये समावेश होतो. मात्र, या सर्व घटकांमध्ये पाणी चोरीचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व्यवस्थेतील नुकसान कमी करण्यासाठी महापालिकेने दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याचे ठरवले आहे.

अनधिकृत नळजोडण्या नियमित करण्यावर भर

महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील अनधिकृत जलजोडण्या हा ‘नॉन-रेव्हेन्यू वॉटर’चा महत्त्वाचा भाग असल्याने त्या नियमित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नियमांमध्ये आवश्यक सुलभता आणून या जोडण्या अधिकृत केल्यास महापालिकेला त्यातून महसूल मिळू शकतो.

तसेच पाणीगळतीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी २४ तास कार्यरत असलेल्या पथकांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.

६ हजार किलोमीटरचे जलवाहिनी जाळे

मुंबईला तुळशी, विहारसह सात तलावांमधून पाणी मिळते. यापैकी काही जलस्रोत मुंबईपासून १०० ते १७५ किलोमीटर अंतरावर आहेत. या जलसाठ्यांमधून मुंबईतील विविध भागांतील घरांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी तब्बल ६,००० किलोमीटर लांबीचे जलवाहिनी वितरण जाळे कार्यरत आहे.

या विस्तीर्ण यंत्रणेतून होणारी गळती कमी करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने बदलण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जलवाहिन्यांचे वय आणि मोठ्या प्रमाणातील वितरण जाळे यामुळे गळती शोधणे आणि तिची तातडीने दुरुस्ती करणे हे महापालिकेसमोरील महत्त्वाचे काम आहे.

अभियंत्यांची रिक्त पदेही अडथळा

पाणी विभागातील मनुष्यबळाची कमतरताही गळती नियंत्रणाच्या कामावर परिणाम करत आहे. पाणी खात्यातील सहायक अभियंत्यांची सुमारे ४५ ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता संवर्गातील सुमारे ३० टक्के पदे भरण्याची आवश्यकता आहे.

अभियंत्यांची रिक्त पदे आणि विस्तीर्ण जलवाहिनी जाळे यामुळे गळती शोधण्याची तसेच दुरुस्तीची कामे प्रभावित होत आहेत. परिणामी, मुंबईला उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी गळती आणि चोरीवर नियंत्रण मिळवणे हे महापालिकेसमोर कायमचे आव्हान ठरले आहे.

संबंधित सामग्री

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

राज-उद्धव ठाकरेंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला. आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार.

Oct 02, 2026