Tipper Crash

कुपटा घाटात टिप्पर-कारची भीषण धडक; मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू

व्यापाराच्या निमित्ताने अमरावतीकडे प्रवास करणाऱ्या मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

कुपटा घाटात टिप्पर-कारची भीषण धडक; मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू

Tipper Crash

मानोरा (Tipper Crash) : व्यापाराच्या निमित्ताने अमरावतीकडे प्रवास करणाऱ्या मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हा भीषण अपघात ४ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कुपटा गावाजवळील घाटात झाला. या दुर्घटनेमुळे मानोरा शहरासह व्यापारी वर्गावर दुःखाचे सावट पसरले आहे. अपघातानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत फरार टिप्पर चालकाला अटक केली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे सुफियान कादर लघा (वय २५) आणि इम्रान जरीब शेख (वय २९, दोघे रा. मानोरा) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुफियान कादर लघा हे मानोरा येथील रेडीमेड कपड्यांचे व्यावसायिक होते, तर त्यांचे मित्र इम्रान जरीब शेख हे जनरल स्टोअर्सचे व्यापारी होते. आपापल्या दुकानासाठी नवीन मालाची खरेदी करण्याच्या उद्देशाने हे दोघे कारने अमरावतीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, कुपटा गावाजवळील घाट रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, टिप्परच्या धडकेमुळे कारचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही युवक कारच्या आतच गंभीररीत्या अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारच्या चक्काचूर झालेल्या भागातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या टिप्पर चालक उत्तम तिरमाळे (रा. उल्लासवाडी, पुसद) याला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026