काँग्रेस उमेदवार अदिती ऋषिकेश पोहरे

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Aditi Rishikesh Pohare

 

व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षक मतदारांची आढावा बैठक
प्रलंबित प्रश्न शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन

मलकापूर (Aditi Rishikesh Pohare) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. सौ. अदिती ऋषिकेश पोहरे यांनी मंगळवारी (२९ सप्टेंबर) मलकापूर येथील व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे शिक्षक मतदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिक्षक, शिक्षिका, प्राचार्य व शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.

शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा भार, जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, रिक्त पदांची भरती, पवित्र पोर्टलमधील अडचणी, शालार्थ आयडी, वेतनातील विलंब तसेच विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या विविध समस्या यावेळी चर्चेत आल्या. शिक्षकांना अध्यापनाच्या मूळ जबाबदारीसोबत सर्वेक्षण, निवडणूक कामकाज, एसआयआर ड्युटी आणि डिजिटल माहिती संकलनासारखी विविध कामे करावी लागत असल्याने या कामांचा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र डेटा एंट्री ऑपरेटरची व्यवस्था करण्याची गरज प्रा. पोहरे (Aditi Rishikesh Pohare) यांनी व्यक्त केली.

“शिक्षकांच्या प्रश्नांना केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचा सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करून निर्णयापर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. शिक्षक प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार आहे,” असे प्रा. अदिती पोहरे (Aditi Rishikesh Pohare) यांनी यावेळी सांगितले. विनाअनुदानित शिक्षण संस्था व तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. संस्थांना भेडसावणाऱ्या आर्थिक व प्रशासकीय अडचणी तसेच कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस व्यासपीठावर श्यामभाऊ राठी, हाजी रशीद खाँ जमादार, व्ही. बी. कोलते कॉलेजचे प्राचार्य अनिल खर्चे सर, काँग्रेसचे नगरसेवक अनिल गांधी तसेच नगरसेवक व शिक्षण विभागाचे अशांतभाई वानखेडे उपस्थित होते. प्राचार्य अनिल खर्चे यांनी विनाअनुदानित शिक्षण संस्था व कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडत शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. तर नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांनी शिक्षक व शिक्षण संस्थांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी शिक्षक मतदारांनी आपल्या विविध अडचणी व प्रश्न प्रा. पोहरे (Aditi Rishikesh Pohare) यांच्यासमोर मांडले. शिक्षकांच्या प्रश्नांचा अभ्यास करूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे सांगत प्रा. पोहरे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. बैठकीला शिक्षक, शिक्षिका, प्राचार्य, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलकापूर तालुक्यातील शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली

संबंधित सामग्री

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026
डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या पोस्टनंतर चर्चेला वेग; मात्र बापटांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही.

Sep 24, 2026
महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

Sep 22, 2026
शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत अदिती पोहरे उतरणार

शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत अदिती पोहरे उतरणार

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अदिती पोहरे उतरणार. उच्चशिक्षित पार्श्वभूमी, अध्यापनाचा अनुभव आणि राजकीय वारसा ठरणार जमेची बाजू.

Sep 13, 2026
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओवी पवारचे यश; अमरावती विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओवी पवारचे यश; अमरावती विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओवी पवारचे यश; १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवत अमरावती विभागीय स्पर्धेसाठी निवड.

Sep 13, 2026