Thane Municipal Corporation

प्रमाणपत्राच्या निर्णयाचा फटका; ठाण्यात शिंदे सेनेच्या नगरसेविकेचे पद गेले

ठाणे महापालिकेच्या प्रभाग ५ (अ) मधील शिंदे सेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीच्या आदेशानंतर रद्द करण्यात आले.

प्रमाणपत्राच्या निर्णयाचा फटका; ठाण्यात शिंदे सेनेच्या नगरसेविकेचे पद गेले

Thane Municipal Corporation

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या १६ जूनच्या आदेशाचा आधार; प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील जागा रिक्त

ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुलेखा चव्हाण प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा तपासणी समितीसमोर प्रलंबित होता. समितीने १६ जून रोजी दिलेल्या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवक पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर या आदेशाच्या आधारे महापालिका प्रशासनाने त्यांचे पद संपुष्टात आणले.

या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रात प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील नगरसेवक पद १६ जून २०२६ पासूनच रद्द झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेतील उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर आता ठाण्यात शिंदे सेनेच्या नगरसेविकेवरही पद गमावण्याची वेळ आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांतच दोन्ही गटांतील नगरसेवकांच्या प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणे चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळातही याकडे लक्ष लागले आहे.

सुलेखा चव्हाण यांची निवड बिनविरोध झाल्यामुळे प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील राजकीय समीकरणांवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता रिक्त झालेल्या जागेबाबत पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय राहणार, तसेच या प्रभागात पुन्हा निवडणूक घेतली जाणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026