Shiv Sena

शिवसेना लातूर जिल्हाप्रमुखाची गीतातून आनंद दिघेंना स्वरांजली!

आनंद दिघे यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे गीत तयार करण्यात आले आहे.

शिवसेना लातूर जिल्हाप्रमुखाची गीतातून आनंद दिघेंना स्वरांजली!

Shiv Sena

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीताचे अनावरण

लातूर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ‘धर्मवीर ठाण्याचा...’ या गीताचे अनावरण धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आले.

आनंद दिघे यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे गीत तयार करण्यात आले आहे.

शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या संकल्पनेतून ‘धर्मवीर ठाण्याचा...’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. दिघे यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे. भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे यांच्याप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे.

या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केले आहे. गीतलेखन महादेव ढमने यांनी केले असून, व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ, लातूर येथे संगीतनिर्मिती करण्यात आली आहे.

‘धर्मवीर ठाण्याचा...’ हे गीत लवकरच विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे. तसेच व्हिडिओ गीताचीदेखील निर्मिती होणार आहे, असे सचिन दाने यांनी सांगितले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026