शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी

खताचा काळाबाजार, पेट्रोल-डिझेल टंचाई व NEET पेपर लीक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवा

Shiv Sena crackdown: खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा कृत्रिम तुटवडा, पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार आणि NEET पेपर लीक प्रकरणी संबंधितांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची आक्रमक मागणी शिवसेना

खताचा काळाबाजार, पेट्रोल-डिझेल टंचाई व NEET पेपर लीक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवा

Shiv Sena crackdown

हिंगोली ( Shiv Sena crackdown) : खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा कृत्रिम तुटवडा, पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार आणि NEET पेपर लीक प्रकरणी संबंधितांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.  शेतकरी सेना, महाराष्ट्र प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम देशमुख यांनी 20 मे रोजी हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात नमूद केले की, खरीप हंगाम तोंडावर असताना काही खत निर्मात्यांनी कृत्रिम भाववाढ केली आहे. व्यापाऱ्यांनी खताचा अवैध साठा करून काळाबाजार सुरू केला आहे. काही पेट्रोल पंप चालक पेट्रोल व डिझेलचा काळाबाजार करून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे.लाखो विद्यार्थी अहोरात्र मेहनत करून NEET ची तयारी करत आहेत. गरीब पालक पोटाला चिमटा घेऊन लाखोंची फीस भरतात. अशा स्थितीत पेपर लीक झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त झाले आहे. खताचा अवैध साठा करणारे, डिझेल-पेट्रोलचा काळाबाजार करणारे आणि NEET पेपर लीक करणाऱ्यांच्या घरावर तातडीने बुलडोझर चालवावा. या (Shiv Sena crackdown) तिन्ही प्रकरणांमुळे शेतकरी आणि विद्यार्थी देशोधडीला लागत आहेत. 

हे निवेदन 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे देण्यात आले. NEET चा पेपर लीक करून विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करणारे, ऐन हंगामात खतांची भाववाढ करून काळा बाजार करणारे व्यापारी आणि पेट्रोल-डिझेलचा काळा बाजार करणाऱ्या पंप चालकांच्या घरांवर सरकारने तात्काळ बुलडोझर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम देशमुख यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. या (Shiv Sena crackdown) समाजकंटकांवर सरकारने सरकारी आवडती बुलडोझर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सहसंपर्क प्रमुख विनायकराव भिसे पाटील, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, जिल्हा प्रमुख अजय सावंत (उर्फ गोपु पाटील) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

Hingoli Farmers Protest March: शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोलीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा

Sep 20, 2026
आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

Hingoli Farmers Protest: प्रस्तावित डिग्रस कर्‍हाळे साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांचा संयम संपत चालला आहे. अनेक शेतकरी कुटूंबासह बैलगाड्या घेऊन लघूपाठबंधारे विभाग

Sep 06, 2026
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026
पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Aug 21, 2026
संसदेत राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे आंदोलन; ‘चर्चेपासून पळू नका’, भाजपचा घणाघात

संसदेत राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे आंदोलन; ‘चर्चेपासून पळू नका’, भाजपचा घणाघात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Aug 11, 2026