रिसोडमध्ये मोठा राजकीय निर्णय; वानखेडे दाम्पत्य अपात्र घोषित, दोन नगरसेवक पदावरून बाद

तिसऱ्या अपत्याची माहिती दडवल्याप्रकरणी रिसोडमधील नगरसेवक बंडू वानखेडे आणि शीतल वानखेडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे.<br/>

रिसोडमध्ये मोठा राजकीय निर्णय; वानखेडे दाम्पत्य अपात्र घोषित, दोन नगरसेवक पदावरून बाद

Risod Municipal Council

रिसोड (Risod Municipal Council) : निवडणूक अर्ज सादर करताना तिसऱ्या अपत्याची माहिती दडवल्याच्या आरोपांवरून रिसोड नगरपरिषदेतील नगरसेवक बंडू रामकिसन वानखेडे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका शीतल वानखेडे यांना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली असून सत्ताधारी गटाला हा गंभीर धक्का मानला जात आहे.

रिसोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत बंडू वानखेडे यांनी पवन छित्तरका यांचा १३९ मतांनी पराभव केला होता, तर शीतल वानखेडे यांनी अंजली देशमुख यांच्यावर २७९ मतांनी विजय मिळवला होता. मात्र, या निकालानंतर पवन छित्तरका यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करत वानखेडे दाम्पत्याला तिसरे अपत्य असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान अनेक पुरावे सादर करण्यात आले.

सुनावणीदरम्यान तक्रारदाराने आरोग्य विभागातील ‘माता सेवा नोंदवही’, ‘बालक सेवा नोंदवही’ तसेच ‘लसीकरण नोंदी’ हे महत्त्वाचे दस्तऐवज सादर केले. या नोंदींमध्ये ४ सप्टेंबर २०२० रोजी शीतल वानखेडे यांना तिसरे अपत्य (बालाजी बंडू वानखेडे) झाल्याची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. वानखेडे दाम्पत्याने हे पुरावे खोटे असल्याचा दावा केला असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी तो फेटाळला.

जन्म नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद नसली तरी इतर शासकीय आरोग्य नोंदींवरून तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध होत असल्याचे निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवले. महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ (१-के) नुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास निवडणूक लढवणे किंवा पद धारण करणे अपात्र ठरते. याच तरतुदीनुसार दोन्ही नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे रिसोडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही नगरसेवक हे आमदार अमित झनक यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या घडामोडींचा स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार की संबंधित दाम्पत्य उच्च न्यायालयात दाद मागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026