Garjana Morcha

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

Garjana Morcha

मुंबईत मेट्रो सिनेमापासून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांचा सहभाग

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढला. मतदारयादीतील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत हा मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मोर्चात सहभागी होत पाठिंबा दर्शवला. 

मोर्चानंतर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रिया, मतदारसंख्या आणि SIRच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यांनी महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया रद्द करण्याची आणि भविष्यात EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. 

‘२०१७ पासून मतचोरीबाबत सांगत आलोय’

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण २०१७ पासून निवडणुकांमधील कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत असल्याचे सांगितले. यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

२०२४च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले, मात्र जनतेमध्ये अपेक्षित उत्साह किंवा जल्लोष दिसला नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदारांची वाढ झाल्याचा आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत एकूण सुमारे एक कोटी मतांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. 

‘देशाचा ढाचा बदलला जातोय’, राज ठाकरेंचा आरोप

राज ठाकरे यांनी सरकारच्या आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांवरही टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही मोजक्या उद्योगपतींना जंगलं, प्रकल्प आणि बंदरांसारखी साधनं दिली जात आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती बिघडवली जात असून इंधनाच्या दरांपासून ते इतर आर्थिक प्रश्नांपर्यंत सरकारच्या धोरणांवर त्यांनी आक्षेप घेतला.

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. हा मोर्चा केवळ एका व्यक्तीविरोधात नसून देशाच्या संस्थात्मक रचनेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी आंदोलनामागील दोन प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली SIR प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी, ही त्यांची पहिली मागणी आहे. तर यापुढील निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, ही दुसरी मागणी त्यांनी मांडली. 

या दोन्ही मागण्यांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता स्पष्ट होईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला. तसेच देशातील सर्व राजकीय पक्षांनी या विषयावर दिल्लीत एकत्रितपणे भूमिका मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले. कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी ती योग्य निवडणूक प्रक्रियेतूनच सत्तेवर आली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मोर्चात विरोधी पक्षांचा सहभाग

ठाकरे बंधूंच्या या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सहभाग नोंदवला. मोर्चाची सुरुवात मेट्रो सिनेमापासून झाली आणि तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाला. मोर्चासाठी पक्षाचे झेंडे न वापरता तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

संबंधित सामग्री

तुपकर, सरनाईकांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना लेखी निर्देश

तुपकर, सरनाईकांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना लेखी निर्देश

Special crop loan camps: कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या प्रश्नाची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे- शेतकरी नेते रविकांत तुपकर

Oct 06, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026