Akhil Chitre

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

Akhil Chitre

दिवाण हाऊसिंगच्या कर्जप्रकरणाचा संदर्भ देत चित्रेंचा आरोप; राणेंवर 38 गुन्हे असल्याचा दावा करत पासपोर्टवरही सवाल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नितेश राणे यांच्याबाबत नव्या आरोपामुळे चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. दिवाण हाऊसिंग कंपनीकडून कर्जप्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे चित्रे यांनी म्हटले असून, यासंदर्भातील कागदपत्रेही त्यांनी दाखवल्याचा दावा केला.

अखिल चित्रे यांच्या म्हणण्यानुसार, नितेश राणे यांनी संबंधित कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न करता ते देशाबाहेर जाऊ शकतात, अशी भीती कंपनीला असल्याने लुकआऊट सर्क्युलर काढण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. हे प्रकरण 7 एप्रिल 2021 रोजीचे असल्याचे चित्रे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर नितेश राणेंनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

लुकआऊट सर्क्युलरच्या कागदपत्रांचा दाखला

लुकआऊट सर्क्युलर कोणत्या परिस्थितीत जारी केले जाते, हे स्पष्ट करण्यासाठी आपण संबंधित कागदपत्रे दाखवत असल्याचे अखिल चित्रे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पासपोर्ट कायद्याचाही संदर्भ दिला.

राणेंच्या वक्तव्यांमुळे कोणाचाही पासपोर्ट रद्द होत नाही, मात्र गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या पासपोर्टसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया लागू होते, असा दावा चित्रे यांनी केला. नितेश राणेंवर 38 गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी म्हटले असून, त्यापैकी काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याचाही दावा केला.

या पार्श्वभूमीवर नितेश राणेंना पासपोर्ट कोणत्या आधारावर मिळाला आणि त्यासाठी कोणत्या न्यायालयाचा आदेश घेण्यात आला, असा सवाल चित्रे यांनी उपस्थित केला. गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला पासपोर्ट मिळवण्यासाठी न्यायालयीन आदेशाची आवश्यकता असते, असा दावा करत त्यांनी राणेंनी उच्च न्यायालयातून असा आदेश घेतला होता का, हे स्पष्ट करण्याची मागणी केली.

मालवणी पोलिसांतील गुन्ह्याचाही उल्लेख

अखिल चित्रे यांनी नितेश राणेंवर मालवणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचाही उल्लेख केला. या प्रकरणात ते जामिनावर बाहेर असल्याचा दावा त्यांनी केला.

दिशा सालियन यांच्या आईने नितेश राणेंविरोधात मालवणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे चित्रे यांनी म्हटले. या प्रकरणात नितेश राणे जामिनावर आहेत की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही चित्रे यांनी केली.

दरम्यान, नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2021 मध्ये लुकआऊट सर्क्युलर जारी केल्याची नोंद उपलब्ध वृत्तांत आहे. हे सर्क्युलर DHFLच्या थकीत कर्जप्रकरणाशी संबंधित होते. पोलिसांच्या माहितीनुसार, राणे कुटुंबाशी संबंधित कर्जखात्यांमध्ये मोठी थकबाकी असल्याचा मुद्दा त्यावेळी समोर आला होता. 

 

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026