रामटेक नगरपरिषद

रामटेक नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधी धडक कारवाई; नागरिकांकडून कौतुक

Ramtek Municipal Council: रामटेक शहरात अतिक्रमणामुळे होत असलेल्या अडथळ्यांवर नगर परिषदेच्या नवीन प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे.

रामटेक नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधी धडक कारवाई; नागरिकांकडून कौतुक

Ramtek Municipal Council

 

अतिक्रमणामुळे शहराच्या विद्रुपीकरणासह होत होता रहदारीस अडथळा
एक एक करून अतिक्रमण उपटून फेकण्याचा नगरपरीषदेचा सपाटा
बसस्थानक परिसरातून प्रारंभ, शहराच्या कोपऱ्यात होणार एंड

रामटेक (Ramtek Municipal Council) : प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा दुरवर ख्यातनाम असलेल्या रामटेक शहराला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाची जणु ' किड ' लागलेली होती. यामुळे शहराचे पुरते विद्रुपीकरण झालेले होते. भरीस भर म्हणजे शहराच्या काही भागात रहदारीस अडथळा निर्माण होवुन चक्क नगर परिषदेच्या, पोलिस प्रशाषणाच्या शासकीय वाहनांनाच वाहतुक सुरळीत होण्याची वाट पहात तात्कळत बसावे लागत असे. मात्र तरीसुद्धा आपल्या दुर्लक्षित व मलाईखाऊ धोरणामुळे तत्कालीन न.प. प्रशासनाने शहराला लागलेली ही अतीक्रमणाची किड उपटून फेकण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत (Ramtek Municipal Council) नगर परिषदेमध्ये नविन बॉडी बसली आणि या बॉडीला आपल्या सक्तीच्या कार्यप्रणालीने नेहमीच चर्चेत असलेल्या महीला मुख्याधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने जवळपास आजपर्यंतची अतिक्रमण विरोधी सर्वात मोठी कारवाई रामटेक शहरात राबविण्यात येत आहे. तेव्हा नागरीक, व्यावसायिक तथा पदाधिकाऱ्यांकडून या अतिक्रमण विरोधी कारवाईचे कौतुक केल्या जात आहे.

नागरीक, व्यावसायीक तथा पदाधिकाऱ्यांनी मांडले दिलखुलास मत

उल्लेखनिय म्हणजे, काही अतिक्रमण धारकांनी तर चक्क ' शासकिय जागेला अपनाही माल ' समजून सिमेंट, रेती, टिनपत्राचे पक्के बांधकाम केलेले होते. काहींनी आठ ते दहा फुट तर काहींनी विस ते पंचेविस फुट जागा स्थायी स्वरूपाचे पक्के बांधकाम करून शासकिय जागा हस्तगत केली होती. (Ramtek Municipal Council) परिणामस्वरूप या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने अर्ध्या रस्त्यापर्यंत उभी राहात होती व त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. एवढे होत असतांनाही मात्र असे उलट बुद्धी व्यावसायिक आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना साधे वाहने हटवा असेही म्हणत होते.

नागरीक, व्यावसायिक व पदाधिकाऱ्यांनी मांडलेली मते:

१) कारवाईचे मी समर्थन करीत असून ती योग्यच आहे, नाहीतर येथे बेशिस्तपणा तोंड वर काढेल, तसेच छोट्या दुकानदारांना अस्थायी, फिरते दुकान गाडी तयार करण्यासाठी शासनाने अर्थसहाय्य करायला पाहजे - ऋषीकेश किंमतकर, व्यावसायिक तथा सचिव समर्थ शिक्षण मंडळ 

२) अतिक्रमण विरोधी कारवाईचे मी समर्थन करतो. ती योग्यच आहे. येथे बॉम्बे स्टाईल झाले पाहिजे, सकाळी दुकान लावा, दिवसभर धंदा करा आणि रात्रीच्या वेळेस दुकान सोबत घेऊन जा - सुमीत कोठारी - व्यावसायिक तथा विद्यमान नगरसेवक 

३) कारवाईचे मी समर्थन करतो, ती योग्यच आहे फक्त नगरपरिषद प्रशासनाने व्यापाऱ्यांचा व्यापार लक्षात घेऊन व त्यांच्याशी हितगुज साधून अतिक्रमण कारवाई करावी, कुण्या छोट्या-मोठ्या दुकानदारांचे नुकसान होऊ नये, त्यांचा व्यापार बंद पडू नये याबाबतही थोडा नगरपरिषद प्रशासनाने विचार करावा - संजय मुलमुले भाजप जिल्हा उपाध्यक्ष 

 ४) रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीस त्रास होतो त्यामुळे अतिक्रमण निघावे; परंतु तत्कालीन नगर प्रशासनाने केलेल्या चुकांमुळे सामान्य नागरिक व व्यावसायिक अडचणीत येऊ नयेत याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच अतिक्रमण मोकळे करण्याची मोहीम कुठलाही वैयक्तिक वा पक्षीय भेदभाव न करता झाली पाहिजे. तसेच मोकळे केलेले (Ramtek Municipal Council) अतिक्रमण हे पुन्हा होऊ नये याचीही दक्षता प्रशासनाने घ्यावी - विवेक तोतडे संयोजक(अध्यक्ष), अभियंता आघाडी, भाजपा, नागपुर ग्रामिण(रामटेक) 


दुसरे एक विशेष म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षांपुर्वी आपल्या सक्तीच्या कार्यप्रणालीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या माधुरी मडावी नामक महिला मुख्याधिकारी रामटेक नगर परिषदेला रूजु झालेल्या होत्या. त्यांनी सुद्धा त्यावेळी रामटेक शहर अतीक्रमणमुक्त करण्यासाठी अतिक्रमणधारकांच्या विरोधात मोठ्या कारवाईचा बडगा उगारला होता मात्र तत्कालीन न.प. पदाधिकाऱ्यांनी या कारवाईत मुख्याधिकाऱ्यांना साथ देण्याऐवजी त्यांच्याच विरोधात आंदोलन करून कदाचीत व्होटबँक वाचविण्यासाठी शहराचे विद्रुपीकरण होणे, रहदारीस अडथळे निर्माण होवु देणे पसंत केले होते.
 

संबंधित सामग्री

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुलात अतिक्रमणामुळे पार्किंगची समस्या वाढली असून, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.

Sep 13, 2026
मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुलात अतिक्रमणामुळे पार्किंगची समस्या वाढली असून, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.

Sep 13, 2026
कन्हान मुख्य रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण तात्काळ हटवा

कन्हान मुख्य रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण तात्काळ हटवा

Kanhan Encroachment: मुख्य रस्त्यावरील पक्का फुटपाथ बांधण्या त आलेला असतानाही काही दुकानदारांकडुन साहित्य , बोर्ड तसेच बांधकाम साहित्य (वाळु, गिट्टी, विटा, दगड) फुटपाथ व रस्त्यावर ठेवण्यात

Sep 01, 2026
दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

मुदत बंदमुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही, असा आरोप भाजपाचे गटनेते ॲडव्होकेट दीपक मठपती यांनी केला.

Aug 22, 2026
'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ किंवा विहित वेळेत होतच नाही, उलट आयुक्तांचे आदेश धूळ खात पडलेले असतात. हे आदेश धूळ खात पडण्यासाठी

Aug 11, 2026