Latur Municipal Corporation

दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

मुदत बंदमुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही, असा आरोप भाजपाचे गटनेते ॲडव्होकेट दीपक मठपती यांनी केला.

दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

Latur Municipal Corporation

दोन दिवस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लातूरकरांना वेठीस धरल्याचा आरोप; संबंधितावर अपात्रतेची कारवाई करण्याचीही मागणी

लातूर : लातूर महापालिकेत घडलेला प्रकार निंदनीय असून, मारहाणीच्या घटनेनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही, असा आरोप भाजपाचे गटनेते ॲडव्होकेट दीपक मठपती यांनी केला. दोन दिवस बेमुदत बंद ठेवून लातूरकरांना वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करत या दोन दिवसांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार शासनाने काढू नये, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही मठपती यांनी स्पष्ट केले. लातूर महापालिकेतील एकंदर परिस्थितीबाबत भाजपाची भूमिका मांडण्यासाठी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

महापालिकेतील बेमुदत बंदामुळे लातूरकरांना पाणी मिळाले नाही. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणात अधिकाऱ्यांनी अंधारात सेटलमेंट केली का, असा सवालही मठपती यांनी उपस्थित केला.

सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

लातूर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मठपती म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचे काही नगरसेवक आमदार अमित देशमुख यांना मानतात, तर काही मानत नाहीत. मुळात आमदार अमित देशमुख म्हणजे काँग्रेस पक्ष नव्हे, तर एक कंपनी आहे, असा आरोप त्यांनी केला.

महापौर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला असल्याने त्यांना कोणतेही अधिकार नसल्याचाही आरोप मठपती यांनी केला. लातूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात संबंधितावर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असले तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे मठपती यांनी म्हटले.

या विषयावर जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनी अद्याप आढावा बैठक घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेला गृहीत धरून कारभार सुरू असून, जनता योग्य वेळी त्याला उत्तर देईल, असा इशारा मठपती यांनी यावेळी दिला.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र. भारतीय जनता पक्षानेही तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली..

Oct 04, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

BJP Surgical Strike: उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारीच्या तयारीला वेग दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेत पक्ष यावेळी उमेदवार निवड

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026