Malkapur Municipality

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुलात अतिक्रमणामुळे पार्किंगची समस्या वाढली असून, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.

मलकापूरच्या सत्यम चौकातील नगरपालिका संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात

Malkapur Municipality

गाळेधारकांकडून दुकानांसमोरील जागेचा पोटभाड्याने वापर? पार्किंगअभावी रस्त्यावर वाहने; नागरिकांवर दंडाचा भुर्दंड

मलकापूर : शहरातील सत्यम चौक परिसरातील नगरपालिका संकुल सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. नगरपालिका संकुलातील काही गाळेधारकांनी दुकानांसमोरील वाहनतळासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुकानांसमोरील जागा किरकोळ व्यापाऱ्यांना पोटभाड्याने देण्यात येत असल्याचा आरोप असून, त्यामुळे ग्राहक व वाहनधारकांसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे.

संकुलासमोर वाहन उभे करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना नाईलाजाने आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहतूक पोलिसांकडून नियमभंगाबाबत वाहनांवर कारवाई व दंड केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

जागा अडविणाऱ्यांवर कारवाई कधी?

एकीकडे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जाते; मात्र दुसरीकडे वाहनतळासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमण होत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका प्रशासनाची आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई न करता केवळ रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत असेल, तर हा प्रश्न गंभीर ठरत आहे.

नगरपालिका संकुलातील दुकानांसमोरील जागेचा नेमका वापर कोणत्या परवानगीच्या आधारे केला जात आहे, पोटभाडेकरूंना जागा देण्यात आली आहे का, तसेच सार्वजनिक वापराच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे का, याची नगरपालिका प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची गरज आहे.

पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सत्यम चौक हा शहरातील वर्दळीचा भाग असून येथे नागरिकांची तसेच वाहनांची मोठी ये-जा असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमणामुळे पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडी निर्माण होत असताना नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नगरपालिका प्रशासनाने संकुलासमोरील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवावे, पोटभाड्याने जागा देण्याबाबतची वस्तुस्थिती तपासावी आणि नागरिकांसाठी वाहनतळाची जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी असलेली जागा काहींच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापरली जात असेल, तर त्यावर वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा अतिक्रमण करणाऱ्यांना मोकळे रान आणि नियम पाळणाऱ्या नागरिकांना दंड, अशी विसंगत परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026