जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट

Collector Rahul Gupta: हिंगोलीतील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जवाहर नवोदय विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास, आहार व शिक्षणाच्या सुविधांची माहिती घेतली व संतुष्टी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट

Collector Rahul Gupta

 

वसतिगृह, भोजनालयाची पाहणी; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांनी आज वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवास, आहार व शिक्षणाच्या दर्जाबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी विद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या निवास सुविधांची माहिती जाणून घेतली. स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

यानंतर त्यांनी  विद्यालयातील भोजनालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. भोजनाची  गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि वेळापत्रकानुसार भोजन  पुरवठा याबाबत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. स्वयंपाकगृहाची  पाहणी  करताना अन्नधान्य साठवण, स्वच्छता व्यवस्था तसेच स्वयंपाक प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती घेतली.
जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विद्यालयातील सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण संवादामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल, विविध स्पर्धांमधील सहभाग तसेच ॲकॅडमिक परफॉर्मन्सचा आढावा घेत जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी विद्यालयाच्या एकूण कामकाजाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.  यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मारोती घोणसेटवाड, वरिष्ठ शिक्षक किशन गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026