जवान प्रशांत बारसागडे

केंद्रीय गृहमंत्रालयाचा वतीने जिल्हा पोलीसात कार्यरत सि.६० जवान प्रशांत बारसागडे सन्मानित

Jawan Prashant Barsagde: नक्षल विरोधी अभियानातील कार्यरत पोलीस शिपाई प्रशांत बारसागडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री विशिष्ट आपरेशन पदक प्रदान करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्रालयाचा वतीने जिल्हा पोलीसात कार्यरत सि.६० जवान प्रशांत बारसागडे सन्मानित

Jawan Prashant Barsagde

कूरखेडा (Jawan Prashant Barsagde) : जिल्हा पोलीस दलाचा नक्षल विरोधी अभियानात कार्यरत सि.६० पथकात कार्यरत पोलीस शिपाई प्रशांत बारसागडे याला नक्षल विरोधी अभियानातील विशेष कामगीरी करीता केंद्रीय गृहमंत्रालयाचा वतीने नूकतेच मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) चा कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात "केंद्रीय गृहमंत्री विशिष्ट आपरेशन पदक" प्रदान करीत गौरव करण्यात आला.

पोलीस शिपाई प्रशांत बारसागडे (Jawan Prashant Barsagde) हा मूळचा कूरखेडा जि.गडचिरोली येथील निवासी असून सन २०१२ मध्ये तो जिल्हा पोलीस दलात दाखल झाला तेव्हापासूनच त्याची नेमणूक नक्षल विरोधी अभियाना करीता निर्मित सि.६० या विशेष पथकात करण्यात आली आहे. जिल्हा मूख्यालयातून नक्षल विरोधी अभियानाचे नियोजन कामात मागील काही वर्षात बारसागडे याने विशेष कामगीरी बजावलेली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी देशातून नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत हद्दपार करण्याची घोषणा केली होती या घोषणेला जिल्हातूनही मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचा नेतृत्वात पोलीसांनी जिल्हातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला आहे या यशात सि.६० पथकाची सूद्धा मोठी भूमिका आहे व याच दलात कार्यरत प्रशांत बारसागडे (Jawan Prashant Barsagde) यांचा कार्याची दखल घेत मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख नवल बजाज यांचा हस्ते केंद्रीय गृहमंत्री यांची स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्र पत्र व केंद्रीय गृहमंत्री विशिष्ट आपरेशन पदक प्रदान करीत त्याना सन्मानित करण्यात आले.

संबंधित सामग्री

लडाखमधील 28 भौगोलिक ठिकाणे आता अधिकृत नकाशावर; पाहा कोणत्या ठिकाणांचा समावेश

लडाखमधील 28 भौगोलिक ठिकाणे आता अधिकृत नकाशावर; पाहा कोणत्या ठिकाणांचा समावेश

केंद्र सरकारने लडाखमधील 28 ठिकाणे आणि भौगोलिक संरचनांची सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर प्रमाणित नावांसह नोंद केली आहे.

Oct 03, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना दिल्लीत रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

Sep 30, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026