गडचिरोली धान खरेदी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement

 

गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. आशिष जैवस्वाल यांना निवेदन

कोरेगाव, चोप/ गडचिरोली (Gadchiroli Paddy Procurement) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्थान्ना येणाऱ्या अडचणी दूर करून 7/12 ऑनलाईन प्रक्रिया लवकर चालू करावी. कोरेगाव–चोप रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुस्थितीतील रस्ता उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ॲड. आशिष जैस्वाल साहेब यांना निवेदन देण्यात आले.

सध्या धान खरेदीशी (Gadchiroli Paddy Procurement) संबंधित विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संबंधित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात आणि धान खरेदी प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव–चोप महामार्ग वरील रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.फेब्रुवारी 2023 मध्ये कंत्राटदारांनी या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या बांधकामा सुरू केली मात्र प्रदीर्घकाळ उलटूनही काम पूर्ण न झाल्याने या मार्गावर मोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाचे निर्माणधिन काम केल्याने पूर्ण रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत.हा मार्ग शंकरपूर ते गोंदिया जिल्ह्याला जोडणारा एक महत्त्वाचा जिल्हा मार्ग आहे . या मार्गाची अवस्था खराब झाल्याने  नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

दोन्ही प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात याव्यात, अश्या मागण्याचे निवेदन पालकमंत्र्यां देण्यात आले. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, देसाईगंज खरेदी -विक्री संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी तूपट,सामाजिक कार्यकर्ते चेतन मस्के कृष्णा पुस्तोडे उपस्थित होते