हिंगोली जिल्हा पोलीस दलातील 39 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची जोरदार चर्चा

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 39 पोलीस अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांची पोलीस दलासह जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे.

हिंगोली जिल्हा पोलीस दलातील 39 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची जोरदार चर्चा

Police Transfers

हिंगोली (Police Transfers) : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 39 पोलीस अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांची पोलीस दलासह जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे.

आदेशानुसार हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील शेख मुजीबुर रहमान यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, अझरअलमाखां शफीउल्लाखां पठाण यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, संतोष देवराव करे यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, रमेश संभाजी कोरडे यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, रवि नारायण इंगोले यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, प्रदीप प्रकाश राठोड यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, राहुल विश्वनाथअण्णा गोटे यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, गोविंद सुभाषराव खोडकर यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, ओमनाथ भिकुलाल राठोड यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, शिवाजी शेषराव पवार यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, माधव किशनराव सूर्यवंशी यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, शेख एकबाल सिकंदर यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, गजानन भिकाजी गिरी यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, गजानन टोपाजी भालेराव यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, सय्यद इम्रान स. अशरफ कादरी यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे तसेच सुमित विनायकराव टाले यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे.

याशिवाय हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, गोरगाव, नर्सी नामदेव, बासंबा, कुरुंदा, बाळापूर, हत्ता, वसमत शहर, वसमत ग्रामीण आणि एटीव्ही येथील अन्य अंमलदारांचीही पोलीस मुख्यालय, हिंगोली व मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे पुढील आदेशापर्यंत तैनाती करण्यात आली आहे.

सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना 29 मे रोजी रात्री 8 वाजेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या या मोठ्या फेरबदलामुळे पोलीस दलात आणि जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी डिसेंबर 2025 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सखोल अभ्यास करून या बदल्या केल्याची चर्चा आहे. विशेषतः बहुतांश पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील अर्थकारणाशी निगडित कर्मचाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश असल्याने पोलीस दलात अमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026