Parbhani Crime

परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव येथे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

राणीसावरगावातील फुगणरवाडी रस्त्यावर स्थागुशा पथकाची कारवाई; तिघांना ताब्यात, तिघे फरार

परभणी : गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव येथे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत रोख रकमेसह ६ दुचाकी आणि ३ मोबाईल असा एकूण ३ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आणि सहायक पोलीस निरीक्षक जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी पथकाला राणीसावरगाव येथील फुगणरवाडी रस्त्यावर पत्त्यावर पैसे लावून अवैधरित्या आणि बेकायदेशीरपणे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोलीस हवालदार महेश कवठाळे, पोलीस हवालदार राहुल परसोडे, पोलीस हवालदार सचिन भदर्गे, पोलीस हवालदार माणिक वाघ आणि पोलीस शिपाई दिलीप निलपत्रेवार यांच्या पथकाने शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान फारुख खाजा मिया शेख, विलास यादवराव जाधव आणि विकास प्रकाश चाफाकानडे यांना ताब्यात घेण्यात आले. तर वसीम बाबू सय्यद, दयानंद संभाजी हाके आणि खलील मनोद्दीन शेख हे तिघे फरार झाले.

पथकाने रोख रकमेसह ६ दुचाकी आणि ३ मोबाईल असा एकूण ३ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपाली गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळदरी पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026