परभणी अवैध वाळू उपसा

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

Parbhani Illegal sand mining: परभणीत गुंज शिवाराच्या पांढरपानी नद्यापात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या सात ट्रॅक्टरांच्या मालकीवर ६० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

Parbhani Illegal sand mining

 

६० लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत....!

विशेष पथक, स्थागुशा आणि पाथरी पोलिसांची संयुक्त कारवाई

परभणी (Parbhani Illegal sand mining) : पाथरी तालुक्यातील गुंज शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणार्‍यां वाळू माफियाविरुद्ध पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक , स्थानिक गुन्हे शाखा व पाथरी पोलीसांनी संयुक्त शुक्रवारी पहाटे कारवाई केली.  या कारवाईत तब्बल सात ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आठ ट्रॅक्टर चालक मालकांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी रात्री पाथरी परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध पेट्रोलिंग करीत होते. रात्री  दीड वाजता पथक सेलू कॉर्नर परिसरात आले असता पाथरी पोलीस ठाण्याचे पोह. बालाजी लटपटे व अन्य कर्मचारी भेटले. मिळालेल्या माहितीनुसार दोन पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी गुंज शिवारातील गोदावरी नदीपात्रात पहाटे  दोन वाजता छापा टाकला.

पोलिसांची चाहूल लागताच नदीपात्रात वाळू भरत असलेल्या ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरमधील वाळू जागेवरच खाली टाकून वाहने सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पंचांसमक्ष पाहणी केल्यानंतर सात ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यामध्ये महिंद्रा अर्जुन ५५५ डीआयचे तीन ट्रॅक्टर, जॉन डियर कंपनीचे ५१०३ एस, ५०५० डी आणि ५२१० हे तीन ट्रॅक्टर तसेच स्वराज ८५५ एफई या ट्रॅक्टरचा समावेश आहे. दरम्यान जॉन डियर कंपनीचा एमएच ३२ पी ४५८४ क्रमांकाचा ट्रॅक्टरही पोलिसांच्या हाती लागला होता.

मात्र त्याचा चालक अंधाराचा फायदा घेत नदीपात्रातून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला याप्रकरणी आठ ट्रॅक्टर चालक-मालकांविरुद्ध पाथरी पोलीसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई  पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस हवालदार यशवंत वाघमारे, पोलीस हवालदार चुडावकर, पोलीस शिपाई वाव्हळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार काळे, बुकरे, वड, पोलीस शिपाई चौरे, डुकरे, फड, चव्हाण, ढवळे तसेच पाथरी पोलीस ठाण्याचे पोह . बालाजी लटपटे  या  पथकाने केली. 

कारवाईपूर्वी बेकायदा वाळू उपशाचा धुमाकूळ
गुंज (खुर्द) येथील गोदावरी पात्रातून वाळू उपशाचा लिलाव झालेला नसतानाही मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरू होता. रात्री १० ते पहाटेपर्यंत वाळू उपसा करून वाहनांद्वारे वाहतूक केली जात होती. वाहनांच्या रांगा लागल्याने परिसरातील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. महसूल कर्मचार्‍याला धमकी देण्याची घटना घडूनही हा प्रकार सुरूच राहिल्याने प्रशासनाचा धाक उरला नसल्याची चर्चा होती. शुक्रवारी पहाटे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केल्याने या बेकायदा वाळू उपशाला चाप बसण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

निलंगा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू आणि ४५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Sep 22, 2026
सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

Sengaon Illegal Sand Mining: सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांनी दोन टिप्पर पकडून गुन्हे दाखल केले.  सेनगाव तालुक्यातील पाटोदा संत सेवालाल महाराज चौक व म्हाळसापूर शिवारामध्ये...

Sep 06, 2026
परभणीत अवैध वाळू उपसा करणारा तराफा केला नष्ट..!

परभणीत अवैध वाळू उपसा करणारा तराफा केला नष्ट..!

Parbhani illegal Sand Mining: गंगाखेड तालुक्यातील झोला शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारा तराफा बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत जप्त

Aug 12, 2026
कयाधू नदीपात्रात पोलिसांची धाड ; 1 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली  जप्त, 1 ट्रॅक्टर पसार

कयाधू नदीपात्रात पोलिसांची धाड ; 1 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली  जप्त, 1 ट्रॅक्टर पसार

Illegal sand mining: कळमनुरी तालुक्यातील बिबथर शिवारात कयाधू नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी थेट नदीपात्रात जाऊन छापा मारला.

Jul 06, 2026
परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

Parbhani syrup stock seized: परभणीतच्या खंडोबा बाजारात रात्रगत पोलिस पथकाने अवैध नशेसाठीच्या वाहतूकाची माहिती मिळवून २ लाख ३० हजार रु.चा साठा जप्त केला.

Jul 02, 2026