परभणी अवैध वाळू

परभणीत अवैध वाळू उपसा करणारा तराफा केला नष्ट..!

Parbhani illegal Sand Mining: गंगाखेड तालुक्यातील झोला शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारा तराफा बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत जप्त

परभणीत अवैध वाळू उपसा करणारा तराफा केला नष्ट..!

Parbhani illegal Sand Mining

 

महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

परभणी (Parbhani illegal Sand Mining) : गंगाखेड तालुक्यातील झोला शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारा तराफा बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत जप्त करून नष्ट करण्यात आला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळू उपस्याचे कंत्राट बंद असतांना सुद्धा गोदावरी नदी पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे व पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकातील नायब तहसीलदार अशोकराव केंद्रे, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड, पोह योगेश भैराणे, पो.शि. श्रीकृष्ण तिडके, दफेदार उद्धवराव शिसोदे, एकनाथ शहाणे, हरिश पवार आदी कर्मचारी बुधवार १२ ऑगस्ट रोजी झोला शिवारात गेले असता जुन्या पाण्याच्या टाकी जवळील गोदावरी नदी पात्रातुन अवैधरित्या वाळू उपसा करणारा एक तराफा आढळून आला.

गोदावरी नदी पात्रात पथक आल्याचे समजताच अवैध वाळू उपसा (Parbhani illegal Sand Mining) करणाऱ्यांनी तराफा गोदावरी नदीतील पाण्यात मध्यभागी सोडून पळ काढला तेंव्हा पथकातील कर्मचाऱ्यांनी नदी पात्रातील पाण्यात उतरून मध्यभागी असलेला तराफा पोहून काठावर आणत जप्त करून जाळून नष्ट केला. अवैध वाळू उपस्याविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने वाळू माफियांचे धाबे दनाणले असुन गोदावरी नदी पात्र परिसरातून वाळू माफियानी पळ काढला आहे. 

अवैध वाळू उपस्याविरुद्ध सतत कारवाई व्हावी

वाळू धक्के सुटलेले नसतांनासुद्धा गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी काठच्या धारासूर, मैराळसावंगी, गौडगाव, चिंचटाकळी, महातपुरी, आनंदवाडी, खळी, दुस्सलगाव, मुळी, भांबरवाडी, धारखेड, गंगाखेड शहरातील रेल्वे पुल परिसर, झोला, पिंप्री, नागठाणा, मसला आदी गावा लगतच्या गोदावरी नदी पात्रातून वाळू माफिया राजरोसपणे वाळू उपसा करीत असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या सुरु केलेली अवैध वाळू उपस्याविरुद्धची मोहीम सतत राबवून अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोदावरी नदी काठच्या गावात राहणाऱ्या पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026