अवैध वाळू उपसा

कयाधू नदीपात्रात पोलिसांची धाड ; 1 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली  जप्त, 1 ट्रॅक्टर पसार

Illegal sand mining: कळमनुरी तालुक्यातील बिबथर शिवारात कयाधू नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी थेट नदीपात्रात जाऊन छापा मारला.

कयाधू नदीपात्रात पोलिसांची धाड ; 1 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली  जप्त, 1 ट्रॅक्टर पसार

Illegal sand mining

आखाडा बाळापूर (Illegal sand mining) : कळमनुरी तालुक्यातील बिबथर शिवारात कयाधू नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी थेट नदीपात्रात जाऊन छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी 1 ट्रक्टर आणि 2 ट्राली जप्त केल्या असून एक ट्रक्टर चालक ट्राली सोडून पसार झाला.

पावसाळा सुरू झाल्याने वाळू घाटांचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. तरीही कयाधू नदीच्या पात्रातून आणि इतर भागातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत्या.
आज पोलिस अधीक्षक श्रेनिक लोढा आणि पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. 
पथकात प्रशांत शिंदे, सुनील रिठे, सागर वाढोणकर, चालक प्रवीण चव्हाण, होमगार्ड बांगर आणि खिल्लारे यांचा समावेश होता.

छाप्यात अंदाजे 7 लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा ट्रक्टर आणि दोन ट्राली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बिट प्रमुख सुनील रिठे यांनी रात्री 7 वाजता दिली.  (Illegal sand mining) पोलिसांनी पळालेल्या ट्रक्टर चालकाचा शोध सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026