सेनगाव अवैध रेती

सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

Sengaon Illegal Sand Mining: सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांनी दोन टिप्पर पकडून गुन्हे दाखल केले.  सेनगाव तालुक्यातील पाटोदा संत सेवालाल महाराज चौक व म्हाळसापूर शिवारामध्ये...

सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

Sengaon Illegal Sand Mining

हिंगोली (Sengaon Illegal Sand Mining) : सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांनी दोन टिप्पर पकडून गुन्हे दाखल केले.  सेनगाव तालुक्यातील पाटोदा संत सेवालाल महाराज चौक व म्हाळसापूर शिवारामध्ये ६ सप्टेंबर रोजी टिप्पर क्रमांक एमएच ३८ एक्स ३६७९ व टिप्पर क्रमांक एमएच ३८ एक्स ३४१४ या मधून प्रत्येकी दोन ब्रास उत्खनन करून रेती ब्रम्हवाडी शेतशिवारातील पुर्णा नदीच्या पात्रातून नेण्यात येत असताना पोलिसांनी वाहन थांबवून कागदपत्राची विचारणा केली. 

परंतु चालकाकडे कोणतेही कागदपत्र मिळून आले नसल्याने दोन्ही टिप्पर सेनगाव पोलिस ठाण्यात आणुन लावले. या प्रकरणात अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयातील सुमित टाले यांनी रितसर तक्रार दिली. त्यानुसार गजानन नामदेव डव्हळे रा. उटी ब्रम्हचारी, टिप्पर क्रमांक एमएच ३८ एक्स ३६७९ चा चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दोन टिप्परसह अवैध रेती असा एकुण २० लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Sengaon Illegal Sand Mining) प्रकरणाचा पुढील तपास जी.एस. पाचपुते हे करीत आहेत. 

विशेष म्हणजे सेनगाव तालुक्यात अवैध रेतीचे उत्खनन होत असल्याने पोलिसांनी रेती माफीयांवर लक्ष केंद्रीत केले आहे. (Sengaon Illegal Sand Mining) अवैध रेतीवर कारवाई करण्याकरीता पोलिस व महसुल प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.