नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा इशारा; शनिवारला शाळांना सुट्टी

जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांना शनिवार 18 एप्रिल रोजीची  सुट्टी जाहीर केली आहे.

नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा इशारा; शनिवारला शाळांना सुट्टी

Nagpur Heatwave

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य

नागपूर (Nagpur Heatwave) : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांना शनिवार 18 एप्रिल रोजीची  सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकारांचा वापर करत हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा हद्दीतील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांना दिनांक 18 एप्रिल  (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, संबंधित सर्व शासकीय व निमशासकीय विभागांना या आदेशाची माहिती देण्यात आली असून, आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

संबंधित सामग्री

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २३ सप्टेंबरपासून विदर्भात पावसाची शक्यता. २४-२५ सप्टेंबरला चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

Sep 21, 2026
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे ढग; विदर्भासह ११ जिल्ह्यांना अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे ढग; विदर्भासह ११ जिल्ह्यांना अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. ११ जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा असून १३ सप्टेंबरला काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक

Sep 12, 2026
शेतकऱ्यांची चिंता वाढली! विदर्भात पावसाचा जोर कमी; अमरावती-गोंदियाचा ऑरेंज अलर्ट रद्द

शेतकऱ्यांची चिंता वाढली! विदर्भात पावसाचा जोर कमी; अमरावती-गोंदियाचा ऑरेंज अलर्ट रद्द

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे.

Sep 03, 2026
उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

Aug 28, 2026
शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या आणि मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

Aug 27, 2026