Vidarbha Rain Alert

शेतकऱ्यांची चिंता वाढली! विदर्भात पावसाचा जोर कमी; अमरावती-गोंदियाचा ऑरेंज अलर्ट रद्द

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! विदर्भात पावसाचा जोर कमी; अमरावती-गोंदियाचा ऑरेंज अलर्ट रद्द

Vidarbha Rain Alert

नागपूर, अमरावती, गडचिरोली आणि गोंदियाला येलो अलर्ट; जळगावात २०-२५ दिवसांपासून पावसाची दडी

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पावसाळ्याचे जवळपास तीन महिने उलटूनही अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच नागपूर वेधशाळेच्या नव्या अंदाजामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा वाढण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांसाठीचा ऑरेंज अलर्ट मागे घेत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नव्या हवामान अंदाजानुसार विदर्भातील नागपूर, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सध्या विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही भागांत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. नागपूर वेधशाळेचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला मुसळधार पाऊस अद्याप झालेला नाही.

पावसाचा अभाव केवळ पिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी आणि महापुराचा सामना केल्यानंतर यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. उभी पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

जळगावात पिकांवर पावसाअभावी संकट

जळगाव जिल्ह्यात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही भागांत अतिवृष्टी, तर काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पाऊस झाला. पुढील काळात समाधानकारक पाऊस होईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या पूर्ण केल्या.

मात्र पिकांची उगवण झाल्यानंतर त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊसच पुरेसा झालेला नाही. त्यामुळे हलक्या जमिनीवरील पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, भारी जमिनीतील पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांवर पावसाअभावी परिणाम होत आहे. पिके कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

संबंधित सामग्री

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026