तरुणीच्या विनयभंगप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

शहरातील एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

Molestation Case

मानवत शहरातील घटना; धमकी व शिवीगाळ केल्याचाही आरोप

मानवत (Molestation Case) : शहरातील एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, ११ जून रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या घरासमोर उभी असताना आरोपी सत्यम दहे याने तिच्या गालाला हात लावून मिठी मारत तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

यावेळी जवाहरसिंग झिंजर, राहुल सोनटक्के आणि अजय दुधाने हे देखील घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादी तसेच तिच्या आई-वडिलांशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच सत्यम दहे याच्याशी वाद घातल्यास तलवारीने ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सत्यम दहे, जवाहरसिंग झिंजर, राहुल सोनटक्के आणि अजय दुधाने (सर्व रा. मानवत) यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026