हिंगोली (MLA Santosh Bangar) : येथील श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये त्यांना कुठे अडचण जाणवल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन आ. संतोष बांगर यांनी दिले आहे. हिंगोलीचा रावण दहन हा आगळा-वेगळा असतो जवळपास १ लाख नागरीक रावण दहनला उपस्थित असतात. सध्या दसरा महोत्सव भरविण्याबाबत पेचप्रसंग निर्माण झाला असला तरी या दसरा महोत्सवाच्या परंपरेला प्रशासनाने खंड पडू देऊ व पुर्वी सारखाच दसरा भरवावा असे आवाहन आ. संतोष बांगर यांनी केले आहे.