आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

MLA Santosh Bangar: हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर

हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

MLA Santosh Bangar

हिंगोली (MLA Santosh Bangar) : हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी एकूण सात कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये नागरी दलितेत्तर योजनेतून चार कोटी आणि पर्यटन योजनेतून तीन कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

नागरी दलितेत्तर अंतर्गत जलेश्वर तलावाभोवती पाथवेचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी अडीच कोटी रुपये आणि तलाव परिसरात डेकोरेटिव्ह गार्डन पोल बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर पर्यटन विकास योजनेतून हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील जलेश्वर मंदिर येथे तलावावरील आवक नाल्यावर पूल बांधकाम करण्यासाठी दोन कोटी रुपये आणि तलाव परिसरात बगीचा विकसित करण्यासाठी एक कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

जलेश्वर तलाव हा हिंगोली शहराच्या वैभवात भर घालणारा असून त्याच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. तसेच पर्यटनाला चालना मिळून नागरिकांना एक उत्तम पर्यटन स्थळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित सामग्री

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात

Sep 30, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये

Sep 21, 2026
आ. संतोष बांगर यांनी जि. प. घ्या बैठकीत प्रशासनाचे काढले वाभाडे

आ. संतोष बांगर यांनी जि. प. घ्या बैठकीत प्रशासनाचे काढले वाभाडे

MLA Santosh Bangar: जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत १५ ऑगस्ट शनिवार रोजी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले.

Aug 16, 2026
हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भव्य कावड यात्रेची आढावा बैठक 14 ऑगस्टला

हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भव्य कावड यात्रेची आढावा बैठक 14 ऑगस्टला

MLA Santosh Bangar: शिवसेनेचे नेता आमदार संतोष बांगर हिंगोलीत 14 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी कावड यात्रेचे निर्णय प्रकल्पणासाठी बैठक आयोजित करत आहेत.

Aug 13, 2026
शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

MLA Santosh Bangar: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी शक्तिपीठ महामार्गावरील कंपनी कर्मचारियोंच्या मोजणी प्रक्रियाला विरोध केला. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पथक

Aug 13, 2026