आ. संतोष बांगर

आ. संतोष बांगर यांनी जि. प. घ्या बैठकीत प्रशासनाचे काढले वाभाडे

MLA Santosh Bangar: जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत १५ ऑगस्ट शनिवार रोजी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले.

आ. संतोष बांगर यांनी जि. प. घ्या बैठकीत प्रशासनाचे काढले वाभाडे

MLA Santosh Bangar

 

सीईओंना फटकारले, नोकर आहात, नोकरासारखं काम करा

हिंगोली (MLA Santosh Bangar) : जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत १५ ऑगस्ट शनिवार रोजी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बांगर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खा. रामराव वडकुते, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. राजु नवघरे, आ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस श्रेणीक लोढा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना,  अधिष्ठाता डॉ .चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस आदींची उपस्थिती होती.
  
बैठकीत संताप व्यक्त करताना आ. बांगर (MLA Santosh Bangar) म्हणाले, नोकर आहात तुम्ही, नोकरासारखं काम करा त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची चिरफाड करत रिक्त पदे, अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनमानी बदल्यांचा मुद्दा थेट मांडला.

कळमनुरी तालुक्यातील पोतरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुद्दा उपस्थित करत बांगर म्हणाले, वारंवार सांगूनही त्या ठिकाणी तुम्ही माणसं दिली नाहीत. कशामुळे दिली नाहीत डॉक्टर, कर्मचारी अजूनही दिले नाहीत. जिल्हा परिषदेची सगळी बोंबाबोंब करून टाकली आहे.

जिल्हा परिषदेत कर्मचारी नसल्याने कामे कशी होणार असा सवाल करत ते म्हणाले, एकही जिल्हा परिषदेचा कर्मचारी जागेवर नाही. एकही ग्रामसेवक नाही. कोणताच अधिकारी नाही.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा काढत त्यांनी सीईओंना थेट जाब विचारला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना इकडून तिकडे टाकले. तुम्हाला याचा अधिकार काय असा प्रश्न विचारत प्रशासन मनमानीपणे निर्णय घेत असल्याचा आरोप केला.

जिल्ह्यातील शिक्षकांना अतिरिक्त कामाचा बोजा दिला जात असल्याचे सांगत बांगर म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षकांना देखील त्रास देण्याचे काम चालू आहे. त्यांनी काय करायचं  हा तुमचा मनमानी कारभार सुरू आहे. एका तरी शिक्षकांनी सांगावे सीईओंचा कारभार बरोबर आहे का असा सवाल त्यांनी केला.
 
शेवटी सीईओंना जबाबदारीची आठवण करून देत बांगर म्हणाले,लोकांची सेवा आहे. आपल्या पद्धतीनं जगू नका. अधिकार मागू नका. लोकांसाठी काम करा. तुम्ही लोकांचे सेवक आहात लोकांच्या कामासाठी आले आहात त्यांची कामे करा, 

गेल्या अनेक महिन्यांपासून हिंगोली जिल्हा परिषदेतील रिक्त पदे आणि मनमानी कारभाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात

Sep 30, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये

Sep 21, 2026
हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

MLA Santosh Bangar: हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर

Sep 08, 2026
नेदरलँड्सने अमेरिकेतून 68 टन सोने हलवले; युरोपच्या सुवर्णसाठ्याच्या सुरक्षेवर नव्याने चर्चा

नेदरलँड्सने अमेरिकेतून 68 टन सोने हलवले; युरोपच्या सुवर्णसाठ्याच्या सुरक्षेवर नव्याने चर्चा

जागतिक पातळीवर वाढत असलेल्या भू-राजकीय तणावामुळे देशांच्या सोन्याच्या साठ्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Sep 04, 2026
आंदोलक मनपा कर्मचार्‍यांनी रोखला वसमत महामार्ग

आंदोलक मनपा कर्मचार्‍यांनी रोखला वसमत महामार्ग

Municipal Employees Protest: कामबंद वर असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करत बुधवार २ सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालया समोर वसमत रोडवर रास्ता रोको आंदोलन

Sep 02, 2026