गोवा बहिणी संशयास्पद मृत्यू

दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी आधीच काढून ठेवले होते 15 हजार रुपये!

Goa Sisters Suicide Case: दक्षिण गोव्यातील काणकोण परिसरात एकाच घरात दोन वृद्ध बहिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 70 आणि 73 वर्षांच्या या दोन्ही बहिणी अनेक वर्षांपासून एकत्र राहत होत्या.

दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी आधीच काढून ठेवले होते 15 हजार रुपये!

Goa Sisters Suicide Case

 

घरात सुसाईड नोट आणि स्पिरिटची बाटली आढळली

पणजी (Goa Sisters Suicide Case) : दक्षिण गोव्यातील काणकोण परिसरात एकाच घरात दोन वृद्ध बहिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 70 आणि 73 वर्षांच्या या दोन्ही बहिणी अनेक वर्षांपासून एकत्र राहत होत्या. प्राथमिक तपासात दोघींनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे या (Goa Sisters Suicide Case) प्रकरणाचे गूढ पुढील तपासानंतरच उलगडण्याची शक्यता आहे.

अंत्यसंस्कारासाठी काढून ठेवले पैसे

पोलिसांना घरातील बेडरूममध्ये आत्महत्येबाबत माहिती देणारी चिठ्ठी तसेच वैद्यकीय उपयोगात येणारी स्पिरिटची बाटली आढळली. या चिठ्ठीत दोन्ही बहिणींनी आपल्या अंत्यसंस्कारासाठी 15 हजार रुपयांहून अधिक रक्कम बाजूला ठेवली असल्याचे नमूद केले होते. ही रक्कम घरात नेमकी कुठे ठेवली आहे, याचाही उल्लेख चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आठ दिवसांपूर्वी व्यक्त केली होती निराशा?

घटनेच्या सुमारे आठ दिवस आधी स्थानिक पंचायत सदस्य या बहिणींना सरकारी एलपीजी योजनेची माहिती देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. या (Goa Sisters Suicide Case) योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना वर्षाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची तरतूद आहे. त्यावेळी एका बहिणीने या योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला होता. तसेच, ती आयुष्याबाबत निराश असून आपल्याला अधिक काळ जगण्याची इच्छा नसल्याचे तिने सांगितले होते, अशी माहिती चौकशीदरम्यान पंचायत सदस्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरातून दुर्गंधी येत असल्याने प्रकार उघडकीस

रविवारी रात्री सुमारे पावणेदहा वाजता दोन्ही महिला घरात मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घराजवळून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच काणकोण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना दोन्ही मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासानुसार दोघींचा मृत्यू घटनेच्या सुमारे चार दिवस आधी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, (Goa Sisters Suicide Case) मृतदेहांची अवस्था खराब झाल्याने शवचिकित्सकांना मृत्यूचे ठोस कारण निश्चित करता आले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास काणकोण पोलीस करीत आहेत.