महापौर सय्यद इकबाल

महापौर सय्यद इकबाल यांच्यावर हल्याचा प्रयत्न; निषेर्धात अधिकारी, कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन 

Mayor Syed Iqbal: महानगरपालिकेतील महापौर सय्यद इकबाल यांचा दालनात गुरुवारला गुन्हा करून आरोपी अटक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना धाकटा भासण्यासाठी काम बंद आंदोलन

महापौर सय्यद इकबाल यांच्यावर हल्याचा प्रयत्न; निषेर्धात अधिकारी, कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन 

Mayor Syed Iqbal

 

शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी (Mayor Syed Iqbal) : शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांच्या दालनात  गुरुवार ९ जुलै रोजी हल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एका आरोपीवर नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. या घटनेच्या निषेर्धात शुक्रवार १० जुलै रोजी अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,  कचरा डम्पिंग संदर्भातील अर्जावर कारवाई न झाल्याच्या कारणावरुन संशयीताने महापौरांच्या दालनात गोंधळ घालत परवानगी शिवाय मोबाईल वर चित्रीकरण सुरु केले. तसेच महापौरांच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हस्तक्षेप करणारे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांना धक्का बुक्की करुन त्यांचा चश्मा फोडून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांनी, सुरक्षा रक्षकांनी संशयीताला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.

चौकशी दरम्यान संशयीताने कार्यालयात येण्यापुर्वी कचर्‍यात चाकू फेकल्याची माहिती समोर आली असून पोलीसांनी तो चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन शेख रफिक शेख रौफ रा.अली नगर, धार रोड याच्या विरुध्द नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सपोनी शिंदे करत आहेत. पोलीसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले असून काम बंद आंंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महापौरांच्या मध्यस्तीनंतर  दुपार नंतर काम बंद आंदोलन मागे
या घटनेचा निषेध म्हणून अधिकारी, कर्मचारी संघटने तर्पेâ शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारा समोर घटनेच्या निषेर्धात काम बंद आंदोलन करत दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर सय्यद इकबाल यांच्या मध्यस्ती नंतर दुपारी काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व कर्मचार्‍यांच्या सुरक्षित्तेचा प्रश्न ऐरणीवर  आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

संबंधित सामग्री

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा

गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा

गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाख 16 हजार रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी चार पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 24, 2026
जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप

Pusegaon Double murder Case: दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुसेगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४३५ मधील ही घटना असून या ऐतिहासिक निकालामुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली

Sep 01, 2026
गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश

गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश

Fetal Sex Determination Case: गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच

Aug 30, 2026
 जवळ  मांस घेऊन जाणारा पुन्हा एक ऑटो जाळला..

जवळ  मांस घेऊन जाणारा पुन्हा एक ऑटो जाळला..

Vasmat Auto Fire: वसमत (नांदेड) राष्ट्रीय महामार्गावर सातवारी असलेल्या अज्ञात जमावाने 21 जुलैला मांस घेऊन जात असलेला ऑटो बेकायदेशीरपणे जाळला होता.

Aug 23, 2026