दुहेरी हत्या जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप

Pusegaon Double murder Case: दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुसेगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४३५ मधील ही घटना असून या ऐतिहासिक निकालामुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली

जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप

Pusegaon Double murder Case

 

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील घटना
जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस.एन माने - गाडेकर यांनी सुनावला निकाल

हिंगोली (Pusegaon Double murder Case) : लग्न का करून देत नाही या कारणावरून आजी आणि मावशीचा कुर्‍हाडीने व काठीने निर्घृण खून करणार्‍या आरोपीला हिंगोली येथील जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस.एन. माने-गाडेकर यांनी दुहेरी हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुसेगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४३५ मधील ही घटना असून या ऐतिहासिक निकालामुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

या (Pusegaon Double murder Case) संदर्भात जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी  दिलेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील  दशरथ किसन पहारे यांनी पोलीस ठाणे नर्सी नामदेव येथे  २० मार्च २०२१ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास दशरथ पहारे यांचा भाचा आरोपी रोहीदास नंदुलाल चर्‍हाटे, रा. पुसेगाव ता. सेनगाव याने 'तुम्ही माझे लग्न का करून देत नाही' या कारणावरून वाद घातला. या वादातून त्याने दशरथची आई तथा रोहीदासची आजी देवकाबाई किसन पहारे, (८५) व परभणी येथून आई व बहिणीच्या भेटीसाठी माहेरी आलेली दशरथची बहीण तथा रोहीदासची मावशी मंगलाबाई उत्तम बशिरे, (४५) यांना कुर्‍हाडीने व काठीने डोक्यात, पाठीवर गंभीर मारहाण करून जागीच ठार मारले. तसेच  अनुसयाबाई नंदुलाल चर्‍हाटे (६५) यांना देखील मारहाण करून जखमी केले होते.

या (Pusegaon Double murder Case) प्रकरणी पोलीस ठाणे नर्सी नामदेव येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा सखोल तपास तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम.गिरी यांनी करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय हिंगोली येथे दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश-१ हिंगोली श्रीमती एस.एन.माने-गाडेकर यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी रोहीदास नंदुलाल चर्‍हाटे यास दोषी ठरवले.

न्यायालयाने रोहीदास चर्‍हाटे याची दशरथची आई देवकाबाई किसन पहारे यांच्या खून प्रकरणी भा.दं.वि.कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजुरी तसेच मंगलाबाई उत्तम बशिरे यांच्या खून प्रकरणी देखील जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार  रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. तसेच  अनुसयाबाई चर्‍हाटे यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार  रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी आणि कलम ५०६ अंतर्गत ३ वर्ष सक्तमजुरी व १५  हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली असून सर्व शिक्षा एकत्रितरित्या भोगण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मयत देवकाबाई किसन पहारे यांचे कायदेशीर वारस दशरथ किसन पहारे, मंगलाबाई उत्तम बशिरे यांचे कायदेशीर वारस तसेच जखमी अनुसयाबाई नंदलाल चर्‍हाटे यांना नियमानुसार योग्यती  नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हा विधीसेवा प्राधीकरण परभणी यांना दिले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी बाजू मांडले. व न्यायालय समक्ष एकुण १३ साक्षिदार तपासले. तसेच अंतिम युक्तीवाद सादर केला. त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे व श्रीमती सविता एस. देशमुख - जाधव यांनी सहकार्य केले. (Pusegaon Double murder Case) सदर प्रकरणी कोर्ट पैरणी महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीमती ज्योती खिल्लारे पोलिस ठाणे नर्सी नामदेव यांनी सहकार्य केले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026
वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा 17 वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची निर्दोष सुटका

वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा 17 वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची निर्दोष सुटका

वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा 17 वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका.

Sep 23, 2026