माजी आमदार सुधाकर भालेराव

उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ बैठक घेतल्याने आपणास जिवे मारण्याची धमकी!

MLA Sudhakar Bhalerao: माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरणासाठी मागणी करताना धमक्या मिळाल्याचे नोंदवले. ते शिवसेच्या माजी नेत्यांविरुद्ध धमकी

उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ बैठक घेतल्याने आपणास जिवे मारण्याची धमकी!

MLA Sudhakar Bhalerao


माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आरोप; पोलीस संरक्षणाची केली मागणी

लातूर (MLA Sudhakar Bhalerao) : अनुसूचित 59 जातीसाठी अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या न्याय्य हक्कांसाठी मागणी पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक सामाजिक भूमिका व्यक्त करत असताना कांही समाज कंटकाच्या वतीने फोनद्वारे व सोशल मिडियावर एसएमएसद्वारे मला शिवीगाळ व जीवे मारण्याची वारंवार धमक्या देणे सुरू आहे. म्हणून माझ्या जिवीतास धोका निर्माण झाल्यामुळे मला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली केली. याबाबत लातूर येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे व राजकुमार बडोले यांच्यावर थेट आरोप करीत त्यांच्या समर्थकांकडून अशा धमक्या आल्याचे म्हटले आहे.

दोन वेळा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या सुधाकर भालेराव (MLA Sudhakar Bhalerao) यांनी सांगितले की, माझ्या सार्वजनिक जीवनात मी नेहमीच समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित व सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना न्याय, समान संधी व संविधानिक अधिकार मिळावेत. या भूमिकेतून कार्य केले आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने अनुसूचित जाती व जमातीसाठी उपवर्गीकरण मिळावे, असे भारतातील सर्वच राज्यांना निर्देष दिलेले आहेत. कांही राज्यांनी त्याची अमलबजावणी केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुध्दा अ, ब, क, ड उपवर्गीकरण करावे.

या मागणीसाठी आपण लातूर येथे बैठक घेतल्यानंतर या बैठकीत आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करीत आपणास माजी मंत्री संजय बनसोडे व राजकुमार बडोले यांच्या समर्थकांकडून शिवीगाळ व धनक या येत असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत आपण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत पोलीस संरक्षणाची मागणी केल्याचे भालेराव म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात माझ्यावर शाईफेक करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करीत याप्रकरणी सरकारने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर

पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात परीक्षा कक्षातील CCTV फुटेज समोर आले. मोबाईल वापराचा घटनाक्रम आणि पालकांच्या भेदभावाच्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत.

Sep 24, 2026
ओबीसी आरक्षण संपलंय, आता मुंबईकडे कूच करणार: प्रा. लक्ष्मण हाके

ओबीसी आरक्षण संपलंय, आता मुंबईकडे कूच करणार: प्रा. लक्ष्मण हाके

Hingoli OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी राज्यभरात लढा तीव्र करण्याचा निर्धार ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी हिंगोलीत २६ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Aug 26, 2026
मोहन भागवतांचा मोठा खुलासा; आरक्षण आणि Gen Z वर स्पष्ट भूमिका

मोहन भागवतांचा मोठा खुलासा; आरक्षण आणि Gen Z वर स्पष्ट भूमिका

RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षण, जनरेशन झेडची आंदोलने, शिक्षण व्यवस्था, शेजारी देशांशी संबंध आणि सामाजिक समस्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

Aug 07, 2026
हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

Harshvardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे तीव्र पडसाद

Aug 05, 2026