हिंगोली (Hingoli OBC Reservation) : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी राज्यभरात लढा तीव्र करण्याचा निर्धार ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी हिंगोलीत २६ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राज्य सरकारकडून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र सुरू असून याविरोधात सर्व ओबीसी, भटके-विमुक्त बांधव आपापली वाहने घेऊन मुंबईकडे कूच करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
हिंगोलीतील पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. हाके यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण गेल्या एक-दोन वर्षांपासून पद्धतशीरपणे संपवले जात आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्यात आले असून त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवर ओबीसींची प्रमाणपत्रे बाद होत आहेत, अनेक ठिकाणी प्रमाणपत्रे चॅलेंज केली जात आहेत.
एकदा प्रमाणपत्र रद्द झाले की ते पुन्हा मिळवण्यासाठी सामान्य माणसाला आंदोलन करावे लागते, अशी व्यथा त्यांनी मांडली. यामागे केवळ सत्ताधारीच नाही तर सर्वच पक्षांचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेते जबाबदार असल्याचा आरोप हाके यांनी केला. ओबीसींच्या मानगुटीवर बसून सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसी आरक्षण संपवले आहे, असा घणाघात त्यांनी केला. या लढाईत सर्वसामान्य ओबीसी, बारा बलुतेदार, भटके-विमुक्त समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरणार असून आपापल्या चारचाकी गाड्या, टेम्पो आणि मिळेल त्या वाहनाने मुंबई गाठून तिथे मोठा मोर्चा काढला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीच्या नोकरभरतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शासनाचे एक लाख रोजगार एका खासगी कंपनीला दिले जात असून त्यासाठी १२ टक्के सर्व्हिस चार्ज दिला जात असेल, तर तिथे आरक्षणाचा नियम पाळला जातो का, कामगारांचा पीएफ भरला जातो का, असा सवाल त्यांनी केला. राज्यातील सुशिक्षित ओबीसी, मराठा, एससी, एसटी तरुणांच्या बेरोजगारीला हेच धोरण कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. या लढ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला ओबीसी समाजाचे अॅड. रवि शिंदे, विठ्ठल गाभणे, प्रा. गजानन थोरात, दिनकर कोकरे, प्रदिप मस्के, हिम्मत राठोड, प्रमोद वडकुते, मनोज मस्के, राजू बाभळे, बालाजी देवकर, डॉ. नागोराव जांबुतकर यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी आरक्षण संपलंय, आता मुंबईकडे कूच करणार: प्रा. लक्ष्मण हाके
Hingoli OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी राज्यभरात लढा तीव्र करण्याचा निर्धार ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी हिंगोलीत २६ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
Hingoli OBC Reservation
संबंधित सामग्री
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा
राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.
पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर
IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात परीक्षा कक्षातील CCTV फुटेज समोर आले. मोबाईल वापराचा घटनाक्रम आणि पालकांच्या भेदभावाच्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत.
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! म्हणाले- ‘मी एकटाच जाणार’
मनोज जरांगे पाटील यांनी उद्याच्या मुंबई मोर्चाबाबत मोठा निर्णय घेतला असून, समर्थकांसह जाण्याऐवजी आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरली; जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला
मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम असून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली. पाटोदा ते खोपोलीपर्यंतच्या मुक्कामाचे नियोजनही निश्चित झाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाला हायकोर्टाचा तूर्तास अडथळा नाही; ‘आंदोलनाचा अधिकार हा लोकशाहीचा भाग’
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाला रोखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाने तूर्तास आदेश देण्यास नकार दिला. केवळ अंदाजाच्या आधारे आंदोलन रोखता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.