हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

Harshvardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे तीव्र पडसाद

हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

Harshvardhan Sapkal

 

बुलढाण्यात राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध आंदोलन; कार्यकर्ते संतापले!

बुलढाणा (Harshvardhan Sapkal) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेचे तीव्र पडसाद आज बुलढाण्यात उमटले. सपकाळ यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आज बुधवार ६ आगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भव्य आणि आक्रमक निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

दुःख विसरून कामाला लागलेल्या ताईन वर टीका करणे हीच का काँग्रेसची संस्कृती का ?
आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर तीव्र प्रहार केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांचे कुटुंबातील वैयक्तिक दुःख बाजूला सारून तातडीने महाराष्ट्राच्या कारभारात आणि जनतेच्या सेवेत संपूर्ण कुटुंब रुजू झाले आहेत. संपूर्ण कुटुंब अजूनही या दुःखातून सावरलेले नसताना, काँग्रेस नेत्यांनी अशा प्रकारे राजकीय चिखलफेक करणे अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा सन्मान करणे काँग्रेस पक्ष पूर्णपणे विसरला असून, सपकाळ यांच्यासारखे 'वाचाळवीर' नेते स्वतःच काँग्रेस संपवण्याचा घाट घालत आहेत, असा घणाघात यावेळी करण्यात आला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा तालुकाध्यक्ष निलेश देठे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांच्यासह विशाल फदाट,रामराव नाईक, इम्रान पठाण, रियाज मिर्झा, जगन कानडजे, श्रीराम सुसर, दीपक मोरे, विशाल सोनूने, दिपक गायकवाड,किरण कानडजे, महेश देवरे, मुन्ना पैठणकर, संतोष पवार व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सपकाळ यांनी जाहीर माफी न मागितल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

संबंधित सामग्री

काँग्रेससाठी कार्यकर्त्यांचे योगदान याच शुभेच्छा: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेससाठी कार्यकर्त्यांचे योगदान याच शुभेच्छा: हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस ३१ ऑगस्ट, यावर्षी त्याचदरम्यान संघटन सजन अभियानांतर्गत राज्यातील जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर

Sep 01, 2026
सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा चिखलीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा चिखलीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

Harshvardhan Sapkal's protest: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी व अपशब्द वापरल्याप्रकरणी

Aug 05, 2026
काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अजित निंबाळकर यांची निवड

काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अजित निंबाळकर यांची निवड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निलंगा येथील तरुण, तडफदार कार्यकर्ते अजित निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

Jul 25, 2026
मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात 'ड्रग्जमध्ये अडकवण्याची धमकी'? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात 'ड्रग्जमध्ये अडकवण्याची धमकी'? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Jul 23, 2026
NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी; व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी; व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबईत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Jul 23, 2026