राज्यमंत्री रामदास आठवले

परभणीतील गौर येथील खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा

Minister Ramdas Athawale:

परभणीतील गौर येथील खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा

Minister Ramdas Athawale

 

पत्रकार परिषदेत  केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची मागणी..!

परभणी (Minister Ramdas Athawale) : आंबेडकरी चळवळीचा  परभणी जिल्हा हा बाल्लेकिल्ला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरण लढ्यात देखील या जिल्ह्यातील अनेक भीमसैनिकांनी सक्रीय सहभाग घेतला होता. या जिल्ह्यात मागासवर्गीय व सवर्ण यांच्यातील संबंध मैत्रिपूर्ण असून काही ठिकाणी मात्र अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पूर्णा तालुक्यातील गौर येथील संतोष साळवे या तरून कार्यकर्त्याची कट रचून चारचाकी वाहनाने धडक देऊन त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय (Minister Ramdas Athawale) राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परभणी येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) हे बुधवार १९ ऑगस्ट रोजी आले होते. सकाळी ११.३० सावली शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णा तालुक्यातील गौर येथील संतोष साळवे  खून प्रकरणा विषयी आपली भूमिका मांडली. यावेळी रिपाई राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ भालेराव, राज्यसचिव डी.एन.दाभाडे, जिल्हाध्यक्ष डॉ.विजय गायकवाड, राणूबाई वायवळ,  निवृत्ती हत्तीअंबीरे, वैâलास दाभाडे, विजय सोनवणे, जयप्रकाश इंगोले, अ‍ॅड.लक्ष्मण बनसोडे, उत्तम वाव्हळे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ना.आठवले (Minister Ramdas Athawale) म्हणाले की, समाजातील दलित-मराठा वाद न होता सर्व समाजांनी एकत्रित राहिले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही पहिली मागणी आपण केली असून रेकॉर्डनूसार ओबीसी नोंद असलेल्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, परंतू मनोज जरांगे पाटील यांची सरसकट ओबीसी प्रमाणपत्राची मागणी ही अयोग्य आहे. केंद्रातील मोदी सरकारने ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सर्व समाजातील घटकांना आरक्षण लागू केले आहे. कॉक्रोज पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांनी दिल्ली येथे केलेले आंदोलन हे योग्य प्रश्नावर केले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व मागण्या मोदी सरकारने मंजूर केल्या आहेत.

तसेच  अ, ब, क, ड च्या नावाखाली बौध्द-मातंग वाद होऊ नये, अनुसूचित जातीतील सर्व समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा, परंतू आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून बौध्द समाजावर देखील अन्याय होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मातंग समाजाच्या विकासासाठी आर्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रिपाई एैक्य होणार असेल तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आनंदच होईल, असेही (Minister Ramdas Athawale) ना. आठवले यांनी सांगीतले.

संबंधित सामग्री

पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर

पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात परीक्षा कक्षातील CCTV फुटेज समोर आले. मोबाईल वापराचा घटनाक्रम आणि पालकांच्या भेदभावाच्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत.

Sep 24, 2026
ओबीसी आरक्षण संपलंय, आता मुंबईकडे कूच करणार: प्रा. लक्ष्मण हाके

ओबीसी आरक्षण संपलंय, आता मुंबईकडे कूच करणार: प्रा. लक्ष्मण हाके

Hingoli OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी राज्यभरात लढा तीव्र करण्याचा निर्धार ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी हिंगोलीत २६ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Aug 26, 2026
मोहन भागवतांचा मोठा खुलासा; आरक्षण आणि Gen Z वर स्पष्ट भूमिका

मोहन भागवतांचा मोठा खुलासा; आरक्षण आणि Gen Z वर स्पष्ट भूमिका

RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षण, जनरेशन झेडची आंदोलने, शिक्षण व्यवस्था, शेजारी देशांशी संबंध आणि सामाजिक समस्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

Aug 07, 2026
उपवर्गीकरण विरोधात 59 जातींच्या संयुक्त महामोर्चात लाखो नागरिक येणार 

उपवर्गीकरण विरोधात 59 जातींच्या संयुक्त महामोर्चात लाखो नागरिक येणार 

Sub-Classification Morcha: उपवर्गीकरण विरोधातील महामोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या मोरच्यात ५९ अनुसूचित जातींतील लाखो नागरिक सहभागी

Jun 16, 2026
हिंगोलीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बौद्ध समाजाच्या वतीने मोर्चा 

हिंगोलीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बौद्ध समाजाच्या वतीने मोर्चा 

SC Reservation Morcha: जिल्ह्यातील अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली असा प्रचंड मोर्चा

Jun 01, 2026