शिवसेना ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा

ShivSena Tractor-Bullock Rally: शेतकर्यांचा कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेने मंगळवारी तहसीलकांना धडका देण्याचा मोर्चा आयोजित. करजमाफी धोरणाचा तात्काळ अंमलबजावणी करणे मागण्यात आले.

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा

ShivSena Tractor-Bullock Rally

 

तहसील कार्यालयावर धडक; घोषणाबाजीने सेनगाव दणाणले

सेनगाव (ShivSena Tractor-Bullock Rally) : राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी (उबाटा) शिवसेनेच्या वतीने सेनगाव येथे मंगळवार ता. १६ जुन रोजी भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे हा मोर्चा तालुक्यात लक्षवेधी ठरला.

सेनगाव नगरपंचायत कार्यालया समोरून सकाळी दहा वाजता वाजतगाजत मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधींनी (ShivSena Tractor-Bullock Rally) सरकारच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली.

मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, दिलीपराव घुगे, जिल्हा समन्वयक दिनकरराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण देशमुख, गणेश शिंदे, तालुकाप्रमुख संतोष देवकर, जगदीश पाटील गाढवे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग गुजर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, तालुका संघटक प्रविण महाजन, नगराध्यक्ष वैभव देशमुख, माजी सभापती सोंडू पाटील, उपसभापती बालासाहेब पोले, माजी सभापती संतोष खोडके यांच्यासह राजू मोरे, बी. आर. नायक, गंगाराम फटांगळे, अजय पोले, हरिभाऊ काळे, संजय चिलगर, देविदास वाघ, माणिक देशमुख, गजानन नायकवाल, संतोष पोपळघट, संतोष गायकवाड, दत्ता कोरडे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण आणि अटींच्या कर्जमाफीऐवजी सरसकट कर्जमाफी देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (ShivSena Tractor-Bullock Rally) शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतप्त शिवसैनिकांनी दिला.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026