जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

वयस्कर, बोटांची ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्च‍ित

Collector Rahul Gupta:

वयस्कर, बोटांची ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्च‍ित

Collector Rahul Gupta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
कार्यपद्धती नुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना

हिंगोली (Collector Rahul Gupta) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाताना आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जावे. योजनेच्या पोर्टलवरील संबंधित क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे कर्जखात्याची माहिती तपासल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. यादीमधील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची विस्तृत माहिती दिसेल. या माहितीनुसार मान्य, अमान्य पर्यायाची नोंद झाल्यानंतर ऑनलाइन बोटाच्या ठशांची नोंद घेण्यात येईल.

आधार प्रमाणीकरण करताना बोटांचा ठसा जुळत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. तीन प्रयत्नांनंतरही आधार प्रमाणीकरण झाले नाही, तर ‘"प्रमाणीकरण शक्य नाही" हा पर्याय निवडावा.  यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाने आधार प्रमाणीकरण करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदारांकडे पाठविण्यात येईल.

तहसीलदारांकडून संबंधित शेतकऱ्याची कागदपत्रे (उदा.आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 उतारा इ.) तपासून ओळख निश्चित केली जाईल. आधार क्रमांक आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओळख निश्चित झाल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. वयस्कर तसेच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाबाबत निश्च‍ित केलेल्या कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने पुन्हा दुसर्‍यांदा बनावट फेसबुक अकाऊंट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sep 22, 2026
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य

Sep 15, 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल सादर करा

Collector Rahul Gupta: जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीक

Sep 15, 2026
पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

पोळा सणामुळे वसमत-औंढा नागनाथ रस्ता दोन दिवस बंद

Collector Rahul Gupta: पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश

Sep 08, 2026