Lost Bag

बॅग विसरलेल्या प्रवाशाला ऑटोचालकाने परत केले ७ हजार रुपये

ऑटोमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग ऑटोचालक सुभाष समरीत यांनी परत केली. बॅगमधील ७ हजार रुपये सुरक्षित मिळाल्याने पोलिस निरीक्षक सुनंदा देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बॅग विसरलेल्या प्रवाशाला ऑटोचालकाने परत केले ७ हजार रुपये

प्रवाशाची बॅग शोधून परत केल्याबद्दल ऑटोचालकाचा सत्कार

पारडी : काल दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी ऑटो क्रमांक MH-49-AR-0284 मध्ये सवारी करणारे राजेंद्र सातपुते, महालगाव, सावली फाटा येथून बसून हनुमान मंदिर चौक, पारडी येथे उतरले. मात्र, त्यांची बॅग ऑटोमध्येच विसरली.

सवारी यांनी हनुमान मंदिर चौक, पारडी येथे वाहतूक अंमलदार HC/722 विनोद अवझे व सोबतच्या होमगार्डना बॅग ऑटोमध्ये विसरल्याची माहिती दिली. त्यानंतर HC विनोद अवझे यांनी काही ऑटोचालकांकडे ऑटोबाबत विचारपूस करून बॅगचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, ऑटोचालकाला या बाबत माहिती मिळाल्यानंतर ऑटोचालक सुभाष समरीत यांनी बॅग परत आणून दिली. बॅगमध्ये असलेले ७,००० रुपये व्यवस्थित मिळाले.

प्रवाशाची बॅग शोधून ती सुरक्षितपणे परत केल्याबद्दल ऑटोचालक सुभाष समरीत यांचा मा. पोलिस निरीक्षक सुनंदा देशमुख मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ऑटो चालक : सुभाष समरीत
HC/722 : विनोद अवझे
होमगार्ड/4218 : विशाल जाधव

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026