लातूर (Latur Traffic Police) : शहरात वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने मिनी मार्केट भागात चुकीच्या पद्धतीने मोटार सायकल स्वारास थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोटार सायकलस्वार दुभाजकावर आदळल्याची घटना माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत अखेर त्या कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे विभागीय चौकशीचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
7 जून रोजी मिनी मार्केट येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील अंमलदार पोकॉ/820 शरद कांदे हे (Latur Traffic Police) वाहतूक नियमानासाठी थांबले असता त्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारास चुकीच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पडल्याचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
त्या (Latur Traffic Police) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळवे यांनी चौकशी अहवाल सादर केला असून त्यामध्ये पोलीस अंमलदार शरद कांदे यांनी कसुरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक नियंत्रण शाखेतील 'तो' पोलीस अखेर निलंबित!
Latur Traffic Police: लातूर जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल शरद कांदे याने मिनी मार्केट भागात चुकीच्या पद्धतीने मोटार सायकलस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर दुभाजकावर आघात
Latur Traffic Police
संबंधित सामग्री
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
अवैध धंद्यांवर चंद्रपूर पोलिसांचा दणका
ऑगस्ट २०२६ मध्ये चंद्रपूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात व्यापक कारवाई करत ३७८ गुन्हे दाखल केले आणि ४५९ आरोपींना अटक केली. विविध कारवायांत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश
Fetal Sex Determination Case: गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच
लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.