जवळा बाजार (Paper Leak Case) : येथे शिक्षक पात्रता परिक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रतिमेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जोडे मारो आंदोलन येथील बस स्टैंड वर करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणारे निवेदन पोलीस प्रशासनास सादर करण्यात आले.
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण (Paper Leak Case) हा गंभीर प्रकार असून हयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा प्रकार शिक्षणमंत्र्याच्या निष्ठाळजीपणामुळे झाल्यामुळे शिक्षण-मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली यावेळी हिंगोली जिल्हाप्रमूख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संदेश देशमुख, औंढा तालुका प्रमूख माऊली झटे, जवळा बाजार सर्कल प्रमुख दत्तराव अंभोरे, सुरेश सवंडकर, सखाराम कदम, टाकळगव्हाणचे सरपंच मुंजाजी पावडे, आकाश अंभोरे, एन. डी. नागरे, भगवानराव ढोबळे, बाजार समिती संचालक नवनाथ कुऱ्हे, शिवाजी ढोबळे, तूकाराम गायकवाड, मुंजाजी ढोबळे आदी शिवसैनिकांची उपस्थीती होती. यावेळी सपोनी आयुब शेख, जमादार राजेश ठाकूर, इम्रान सिद्दिकी, दिलीप नाईक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पेपर फुटी प्रकरणी जोडे मारो आंदोलन; शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
Paper Leak Case: जवळा बाजारात शिक्शक पात्रता परीक्षणातील पेपर फुटण्यामुळे उद्धव ठाकरे गटाने शिक्षणमंत्रीच्या रजतनामा मागणी करून टाकली. लाखो विद्यार्थ्यांचा नुकसान होऊन आला आहे.
Paper Leak Case
संबंधित सामग्री
दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध
Yavatmal Bar Association Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी यवतमाळ वकील संघाच्या वतीने शुक्रवार २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेद
NEET' पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार
Adv. Sahebrao More: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटीच्या घटनांवरून प्रसिद्ध समाजसेवक ॲड. साहेबराव मोरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत उग्र शब्दांत टीका
'अमित शाह यांनी दिले विद्यार्थ्यांना मारहाणीचे आदेश'; राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: खासदार राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज थेट अमित शाह यांना उद्देशून होता, असा आरोप
नीट पेपरफुटी प्रकरणी परभणीत नागरीकांचे लाक्षणिक उपोषण
NEET Paper Leak Case: नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करावी
पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार विरोधात मनसे आक्रमक!
NEET paper leak case: देशभरात नीट, जी, यूपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, मानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी