नवी दिल्ली (Rahul Gandhi) : दिल्लीत 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) 'संसद चलो' मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज थेट अमित शाह (Amit Shah) यांना उद्देशून होता, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हटवल्याने समस्या सुटणार नाही.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी देशाची शिक्षण आणि परीक्षा प्रणाली पूर्णपणे पोकळ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, देशातील तरुण आज असहाय्य वाटत आहेत आणि त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी सरकार लाठीचार्जचा आधार घेत आहे.
#WATCH | Delhi | LoP, Lok Sabha, Rahul Gandhi says, "Modi ji has not even apologised for what happened yesterday. The youth are protesting against the education and testing system. The whole country knows that the education and testing system is hollowed out by termites. Why is… pic.twitter.com/2JA0Jwrxpi
— ANI (@ANI) July 21, 2026
अमित शाह आणि पंतप्रधान दोघांनीही राजीनामा द्यावा: राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा संदर्भ देत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्पष्ट केले की, पोलीस आणि दिल्ली प्रशासन हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतात. त्यामुळे, खरे गुन्हेगार गृहमंत्री आहेत. अमित शाह यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यामुळे, केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पुरेसा नाही. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंतिम नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची तात्काळ माफी मागावी."
#WATCH | Delhi: Congress MPs including Lok Sabha LoP Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, KC Venugopal and others hold a protest at Lok Kalyan Marg, demanding the Prime Minister's resignation. pic.twitter.com/UGi0nlDQjv
— ANI (@ANI) July 21, 2026
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटणार राहुल गांधी
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, तरुणांसाठी उत्पन्नाचे इतर सर्व मार्ग आधीच बंद झाले आहेत. स्पर्धा परीक्षांचा एकमेव पर्याय उरला होता, आणि तोही पेपरफुटीमुळे नष्ट झाला. RSS ने शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवला असून, त्यांच्या प्रचारकांना विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नियुक्त केले जात आहे. दुसरीकडे, मोठ्या उद्योगपतींचे वर्चस्व वाढत आहे. तरुणांकडे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठीही पुरेसा निधी नाही. मी स्वतः जखमी विद्यार्थ्यांना लवकरच भेट देईन."
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2026
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने… pic.twitter.com/DbX5L4Iq5C
परिस्थिती हिटलरच्या राजवटीसारखी, विद्यार्थ्यांची डोकी फोडली: अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे (SP) प्रमुख अखिलेश यादव यांनीही जंतर मंतर आणि दिल्लीच्या रस्त्यांवरील हिंसाचाराबद्दल सरकारवर टीका केली. अखिलेश म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर विद्यार्थ्यांसोबत अशी क्रूर वागणूक कधीही पाहिली गेली नाही. "साध्या वेशातील लोकांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना काठ्यांनी मारहाण केली. अनेक तरुणांची हाडे मोडली आणि डोकी फुटली. हे वर्तन अगदी हिटलरच्या काळासारखे आहे. एकट्या उत्तर प्रदेशात 20 हून अधिक पेपरफुटी झाल्या आहेत. सरकार आपल्या मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारत नाही, कारण त्यांना भीती आहे की राजीनामा दिल्यास सर्व जुनी गुपिते उघड होतील."