NEET पेपरफुटी प्रकरण

पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार विरोधात मनसे आक्रमक!

NEET paper leak case: देशभरात नीट, जी, यूपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, मानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी

पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार विरोधात मनसे आक्रमक!

NEET paper leak case

 

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांचे निवेदन!

मानोरा (NEET paper leak case) : देशभरात नीट, जी, यूपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, मानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर शांततापूर्ण रॅली काढून प्रशासनाला निवेदन दिले. त्या रॅलीला मनसेने समर्थन देत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांचे निवेदन दि. २० जुलै रोजी तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठविले. 

महामहीम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, समाजसेवक सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांना पाठिंबा देत, केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,  नीट, जेईई, युजीसी-नेट, टीईटी, आयबीपीएस व इतर पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, एमपीएससी तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन, सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा व सक्षम सुरक्षा यंत्रणा लागू करावी.

शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शासनाने आमच्या मागण्यांचा तातडीने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी पाठविलेल्या विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही  दिला आहे. (NEET paper leak case) निवेदन देतेवेळी मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष घोडे, तालुका उपाध्यक्ष देवा बारसे, शहर अध्यक्ष महादेव भस्मे, सामाजिक कार्यकर्ता सुशांत खडसे, विशाल ठाकरे, गोपाल चव्हाण, शाम पवार, चेतन पवार आदीसह इतरांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली. स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

Sep 29, 2026
MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांनी नव्याने पेपर सेट करण्याची मागणी केली आहे.

Sep 17, 2026
MPSC विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; कर्ज, दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचा पोलिसांकडून तपास

MPSC विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; कर्ज, दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचा पोलिसांकडून तपास

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर अडीच लाखांचे कर्ज होते. दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचाही संदर्भ समोर आला आहे.

Sep 09, 2026
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026