यवतमाळ वकील संघा आंदोलन

दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध 

Yavatmal Bar Association Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी यवतमाळ वकील संघाच्या वतीने शुक्रवार २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेद

दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध 

Yavatmal Bar Association Protest

यवतमाळ (Yavatmal Bar Association Protest) : गेल्या एक महिन्यापासून नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर हजारों विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान प्रशासन व पोलीसांनी लाठीचार्ज करीत गंभीर जखमी केले. या घटनेविरोधात निषेध व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी यवतमाळ वकील संघाच्या वतीने शुक्रवार २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वकील संघाने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी व उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करावी, विद्यार्थ्यांवर लावलेल्या केसेस मागे घ्याव्या व सरकारने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेवून त्यावर योग्य तो तोडगा काढावा.

तसेच नीट पेपर घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबांना शासकीय मदत, सदस्यांना शासकीय नौकरी द्यावी, नीट, जेईई तसेच इतर मोठया परिक्षा या शासनानेच घ्याव्यात व एनटिए संस्था रद्द करावी, अशा विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने यवतमाळ वकील संघाचे जेष्ठ वकील व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संबंधित सामग्री

राहुल गांधी पळणारे नव्हे, भिडणारे नेते: हर्षवर्धन सपकाळ

राहुल गांधी पळणारे नव्हे, भिडणारे नेते: हर्षवर्धन सपकाळ

Rahul Gandhi: राहुल गांधी हे पळून जाणारे नव्हे, तर प्रश्नांना भिडणारे नेते आहेत. उलट संसदेत महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पळ काढत आहेत..

Aug 12, 2026
Anti Paper Leak Bill लोकसभेत मंजूर; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राचे मोठे पाऊल, गदारोळातही विधेयकाला हिरवा कंदील

Anti Paper Leak Bill लोकसभेत मंजूर; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राचे मोठे पाऊल, गदारोळातही विधेयकाला हिरवा कंदील

देशातील परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवर अंकुश आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सादर केलेले 'एंटी पेपर लीक बिल' लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.

Jul 29, 2026
गर्भवती बलात्कार पीडितेच्या गुन्हेगारांना समर्थन देणारे नवे शिक्षणमंत्री...

गर्भवती बलात्कार पीडितेच्या गुन्हेगारांना समर्थन देणारे नवे शिक्षणमंत्री...

Priyanka Gandhi On Pralhad Joshi: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारच्या शिक्षण धोरणावर, पेपरफुटीवर आणि नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर जोरदार हल्ला, ज्यामुळे सभागृहात गदारोळ

Jul 28, 2026
गुजरातमध्ये BAMS पेपरफुटी?  शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

गुजरातमध्ये BAMS पेपरफुटी? शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Gujarat BAMS Paper Leak: NEET आणि उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटी (UTU) च्या बी.टेक सेमिस्टर परीक्षेचे पेपरफुटी प्रकरणानंतर आता गुजरातमध्येही BAMS सर्जरी-1 पेपरफुटी प्रकरण...?

Jul 27, 2026