मोजा हिंगण येथे जलयुक्त शिवार २.० अंतर्गत जलतारा शोष खड्ड्यांच्या कामाचा शुभारंभ

चालू वर्षात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मोजा हिंगण येथे जलयुक्त शिवार २.० अंतर्गत जलतारा शोष खड्ड्यांच्या कामाचा शुभारंभ

Jalyukt Shivar 2.0

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

पातूर (Jalyukt Shivar 2.0) : चालू वर्षात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी तसेच गावातील भूजल पातळी टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत मौजे हिंगण येथे जलतारा शोष खड्ड्यांच्या निर्मितीच्या कामाला उत्साहात सुरुवात करण्यात आली.

हे काम पातूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी मनोज मधुकर पेंढारकर यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून कामाचा शुभारंभ केला तसेच शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.

जमिनीची जलधारण क्षमता वाढणार

यावेळी बोलताना कृषी अधिकारी मनोज पेंढारकर यांनी सांगितले की, जलतारा शोष खड्ड्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच जमिनीची जलधारण क्षमता मजबूत झाल्याने उन्हाळ्याच्या काळात आणि पावसाच्या खंडाच्या कालावधीतही विहिरी व कूपनलिकांना पाणी उपलब्ध राहण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामात लहान-मोठ्या सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित श्रमदान आणि सहकार्य केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू झालेल्या या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार असून, शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दिशेने गावाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

संबंधित सामग्री

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Hingoli Water Scarcity Plan: जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
265 तालुके अंतिम नाहीत; परिस्थितीनुसार आणखी भागांचा समावेश होणार, बावनकुळेंचे संकेत

265 तालुके अंतिम नाहीत; परिस्थितीनुसार आणखी भागांचा समावेश होणार, बावनकुळेंचे संकेत

265 तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीवर सरकारचे लक्ष असून पंचनामे, पीककर्ज, पाणी-चारा आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Sep 26, 2026