पाणी टंचाई आराखडेचे प्रस्ताव सादर करण्याचा सूचना
हिंगोली (Hingoli Water Scarcity Plan) : जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेचा आढावा घेण्यात आला. शेड्युल पूर्ण करून, सभा घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीची माहिती पोर्टलला अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शासन निर्णयानुसार दुष्काळ यादीत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांचा समावेश आहे. त्यानुसार पाणीटंचाई लक्षात घेऊन अवैध व अनधिकृत पाणी उपसा होत असल्यास तो बंद करण्यात यावा. पावसाची कमतरता आणि आगामी काळातील (Hingoli Water Scarcity Plan) पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणी टंचाईचे आराखडे सादर करण्याचा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी संबंधित विभागास दिले. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची गरज भासू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आपले सरकार पोर्टल, आयुक्तालय मुद्दे, पीजी पोर्टल, शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा घेण्यात आला. आयुष्यमान भारत व 'वय वंदना' कार्ड काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. वार्षिक योजना बांधकाम, देखभाल-दुरुस्ती, विकसित भारत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), जलदूत, जलतारा याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा. प्र ) समृद्धी दिवाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) मंजुश्री कल्लेवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपुन भागवत, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के, कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी हे दूरदर्श प्रणाली द्वारे उपस्थित होते.