शेतकरी कुटुंब

जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिलासा

Suicidal Farmer Family: जयपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिलासा

Suicidal Farmer Family

शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश

सेनगाव (Suicidal Farmer Family) : तालुक्यातील मौजे जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील (अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा) यांनी भेट दिली. या प्रसंगी प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  तहसीलदार सखाराम मांडवगडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी ऋषीकेश होळकर, यांच्या सह पशुवैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

अ‍ॅड. हेलोंडे पाटील यांनी पायघन कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच (Suicidal Farmer Family) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. या भेटीदरम्यान प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेत, प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय मदत लवकरात लवकर पोहोचविण्याची ग्वाही दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या तत्परतेमुळे कुटुंबाला काहीसा आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

Saykheda Farmer Suicide: तालुक्यातील सायखेडा येथे शेती नापिकी झाल्याच्या कारणातून ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील लोखंडी पाइपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Sep 28, 2026
परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer suicides: तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट

Sep 28, 2026
इसापूर रमणा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; सामाजिक कार्यकर्त्या मीरा धनराज कदम यांनी लेकरांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

इसापूर रमणा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; सामाजिक कार्यकर्त्या मीरा धनराज कदम यांनी लेकरांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Farmer suicide: जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने वाढवे कुटुंब

Sep 28, 2026