इसापूर रमणा शेतकरी आत्महत्या

इसापूर रमणा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; सामाजिक कार्यकर्त्या मीरा धनराज कदम यांनी लेकरांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Farmer suicide: जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने वाढवे कुटुंब

इसापूर रमणा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; सामाजिक कार्यकर्त्या मीरा धनराज कदम यांनी लेकरांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Farmer suicide

हिंगोली (Farmer suicide) : जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने वाढवे कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले आहे.

या (Farmer suicide) घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या मीरा  कदम आणि धनराज कदम  यांनी तातडीने वाढवे कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील आक्रोश, पोरक्या झालेल्या लेकरांच्या आणि विठ्ठल वाढवे यांच्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून सर्वांचेच मन हेलावले. याच भेटीत मिरा कदम यांनी या कुटुंबातील शरद आणि अंकिता या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची घोषणा केली. सेवासदनच्या माध्यमातून या लेकरांना शिक्षणासाठी बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मीरा कदम भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, "आज पुन्हा एका शेतकरी भावाने आत्महत्या (Farmer suicide) केली आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. शेतकरी भावांनो, हात जोडून विनंती आहे, काळ कितीही कठीण असला तरी आत्महत्या करू नका. तुम्ही गेल्यानंतर तुमचा संसार उघड्यावर पडतो. ज्या पत्नीला आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, तिला एकटे सोडून जाऊ नका. लेकरांच्या आयुष्यात बाप माणूस खूप महत्त्वाचा असतो. घरात बाप नसेल तर लेकरं आत्मविश्वास गमावून बसतात. तुम्ही निघून जाता, पण तुमच्या पत्नीला मात्र त्या चिमुकल्यांसाठी अविरत संघर्ष करावा लागतो."

"अशा कित्येक लेकरांच्या वेदना घेऊन आम्ही रोज जगत आहोत. या लेकरांच्या काळजात किती वेदना असतात हे आम्हाला विचारा. बापाची माया तर आम्ही देऊ शकत नाही, पण शिक्षणाचे बळ देऊन त्यांना उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भावांनो, आपल्या कुटुंबाला असे पोरकेपण देऊ नका," असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत धनराज कदम यांचीही उपस्थिती होती.

मिरा कदम आणि धनराज कदम यांच्या या संवेदनशील निर्णयाचे आणि धडपडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी  संदीप नागरे,विठ्ठल चोतमल, पांडुरंग जगताप , ज्ञानेश्वर जगताप ,हनुमान जगताप , बालाजी जगताप आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

Saykheda Farmer Suicide: तालुक्यातील सायखेडा येथे शेती नापिकी झाल्याच्या कारणातून ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील लोखंडी पाइपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Sep 28, 2026
परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer suicides: तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट

Sep 28, 2026
परभणीतील मिरखेल येथील शेतकर्‍याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

परभणीतील मिरखेल येथील शेतकर्‍याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Parbhani Farmer suicides: पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. जुन महिन्यात शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु पेरणीसाठी लागलेला खर्च देखील निघणार नाही...

Sep 27, 2026