अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transportation: तालुक्यातील इंद्राळ येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर देवणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास वाळू

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transportation

देवणी (Illegal sand transportation) : तालुक्यातील इंद्राळ येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर देवणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास वाळूसह एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास इंद्राळ येथील आंबेडकर चौकाच्या दक्षिणेस सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील ग्रामीण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. जगदीश शंकरराव शिवपुरे (वय ५५, रा. विजयनगर, गौडगाव, ता. देवणी) हा शासनाचा कर बुडवून, कोणताही परवाना अथवा पास नसताना अवैधरीत्या वाळू उत्खनन करून तिची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान JOHN DEERE कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच त्यातील अंदाजे एक ब्रास वाळू पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ७ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई मनोज रघुनाथ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५ तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ मधील कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस नाईक कटेवार यांनी केली. सपोनि अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ. लामतुरे करीत आहेत.

देवणी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त

Illegal sand transportation: सहाय्यक जिल्हाधिकारी, यांच्या आदेशाने व तहसीलदार, माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय माहूरच्या गौण खनिज पथकाने दि. १० सप्टेंबर च्या मध्यरात्री अवैध रेती वाहतुक

Sep 10, 2026
पुरजळ गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई

पुरजळ गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई

Illegal sand transportation: ट्रॅक्टर वाहनासह वाळू असा सहा लाख 5 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sep 04, 2026
अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर पकडले; दहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त 

अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर पकडले; दहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त 

Illegal sand transportation: औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर काळे पेट्रोल पंपाजवळ पोलिसाच्या पथकाने कारवाई करून टिप्पर वाहनासह मुद्देमाल जप्त करून चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल

Sep 04, 2026
जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात; 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात; 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिस पथकाने कारवाई केली.

Jul 11, 2026
परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!

परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!

Parbhani illegal sand: परभणीतील पाथरी येथे पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीवर व गुटखा जप्तीवर धाडीची कारवाई केली. टिप्पर जप्त व दुसऱ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

May 09, 2026