औंढा नागनाथ (Illegal sand transportation) : तालुक्यातून वाहणार्या पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्या टिप्पर वाहनावर ४ सप्टेंबर रोजी पहाटे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर काळे पेट्रोल पंपाजवळ पोलिसाच्या पथकाने कारवाई करून टिप्पर वाहनासह दहा लाख दहा हजारचा मुद्देमाल जप्त करून चालक-मालक यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा (Illegal sand transportation) होत असल्याने महसूल व पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे यादरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर काळे पेट्रोल पंपावर अवैध वाहतूक करणारे टिप्पर क्रमांक एम एच ३८ एक्स ५०२२ यावर कारवाई करून प्रवाह व त्यामधील वाळू असा दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस नाईक पांडुरंग डवले यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक, मालक ज्याचे नाव गाव माहित नाही यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस करत आहेत.
अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर पकडले; दहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त
Illegal sand transportation: औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर काळे पेट्रोल पंपाजवळ पोलिसाच्या पथकाने कारवाई करून टिप्पर वाहनासह मुद्देमाल जप्त करून चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल
Illegal sand transportation
संबंधित सामग्री
अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal sand transportation: तालुक्यातील इंद्राळ येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर देवणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास वाळू
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त
Illegal sand transportation: सहाय्यक जिल्हाधिकारी, यांच्या आदेशाने व तहसीलदार, माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय माहूरच्या गौण खनिज पथकाने दि. १० सप्टेंबर च्या मध्यरात्री अवैध रेती वाहतुक
पुरजळ गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई
Illegal sand transportation: ट्रॅक्टर वाहनासह वाळू असा सहा लाख 5 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात; 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिस पथकाने कारवाई केली.
परभणीत पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धाड, तर घरझडतीत प्रतिबंधित गुटखा जप्त!
Parbhani illegal sand: परभणीतील पाथरी येथे पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीवर व गुटखा जप्तीवर धाडीची कारवाई केली. टिप्पर जप्त व दुसऱ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा जप्त केला.